रत्नागिरी, ता. 07 : कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखेची नूकतीच बैठक घेण्यात आली. ही बैठक कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष व केंद्रीय निरीक्षक गजानन पाटील, केंद्रीय सचिव माधव अंकलगे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत रत्नागिरी शाखेची नवीन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी तेजा रवींद्र मुळ्ये, कार्याध्यक्षपदी चंद्रमोहन देसाई तर उपाध्यक्षपदी राजेंद्र शंकर कदम यांची निवड करण्यात आली आहे. KMSP Ratnagiri


इतर कार्यकारीणीमध्ये सचिवपदी सुनिल एकनाथ चव्हाण, सहसचिवपदी हुसेन कादर पठाण, खजिनदारपदी विद्याधर लक्ष्मण कांबळे, सहकोषाध्यक्षपदी संजय बाळकृण कुळये, जिल्हा प्रतिनिधीपदी आनंद शेलार, महिला अध्यक्षपदी आकांक्षा आनंद भुर्के, युवा अध्यक्षपदी दुर्गेश आखाडे यांची निवड करण्यात आली. कार्यकारीणी सदस्य म्हणून आकांक्षा निगुडकर, मनोजकुमार खानविलकर, राजेंद्र चव्हाण, विजय साळवी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सल्लागार पदी सुभाष भडभडे, प्रमोद कोनकर, राजेंद्रप्रसाद मसुरकर, गणेश गुळवणी, सुनेत्रा जोशी, डॉ. दिलीप पाखरे यांनी निवड करण्यात आली आहे. KMSP Ratnagiri