वरवेली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पुजार यांनी केली हळद लागवडीची पाहणी
गुहागर, ता. 06 : पंचायत समिती गुहागर च्या वतीने राबविण्यात आलेल्या हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत वरवेली येथील क्षितिज शिंदे यांच्या हळद लागवडीला पुजार यांनी भेट दिली. यावेळी एका रोपापासून २.७५० किलोचा गड्डा उत्पादीत झाल्याने ही बाब आश्चर्यकारक असून शिंदे यांच्या कष्टाला नकीच फळ येणार,असे मत पुजार यांनी व्यक्त केले. Kirti Pujar inspected the turmeric cultivation

क्षितिज शिंदे यांनी ३ गुंठयात SK-4 या जातीच्या ७५० रोपांची ३ गुंठयात लागवड केली होती. १० ते १५ ग्रॅमच्या रोपांपासून आज २.५ ते ३ किलोचा हळदीचा गड्डा निर्माण झाला आहे. सीईओ यांच्या समक्ष हळदीचा गड्डा काढण्यात आला. त्याचे वजन २.७५० किलो एवढे आले. आपल्या तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी सचिन कारेकर यांनी २० वर्षाच्या अथक परिश्रमाने निवड पद्धतीने SK-4 हे हळदीचे वाण विकसित केले. या हळदीची कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे इतर वाणाशी तुलनात्मक प्रात्यक्षिक घेण्यात आल्याची माहिती कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी सीईओ यांना दिली. यावेळी पौनीकर यांनी हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमाची व रोपे तयार करून लागवड केल्याची माहितीही त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पुजार यांना दिली. क्षितिज शिंदे यांनी तंतोतंत आवश्यक असलेले तंत्रज्ञान पाळले असून या प्रात्यक्षिक प्लॉटमधून चांगले उत्पादन अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. Kirti Pujar inspected the turmeric cultivation
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, सरपंच नारायण आग्रे , कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्रामसेवक श्री भुवड, प्रयोगशील शेतकरी क्षितिज शिंदे हे उपस्थित होते. Kirti Pujar inspected the turmeric cultivation

