खुल्या गटातील सिद्धेश पाटील ठरला किंग ऑफ कुंभार्ली
गुहागर, ता. 06 : चिपळूण सायकलिंग क्लब तर्फे आयोजित किंग ऑफ कुंभार्ली ही देशभरातील ख्यातनाम सायकल रेस रविवार दि. 4 मे 2025 रोजी मोठ्या दिमाखात पार पडली. अल्पावधीतच प्रसिद्धीचे शिखर गाठलेल्या या सायकलिंग स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते. देशविदेशातून 350 हून अधिक सायकलपटूंनी या रेस साठी रजिस्ट्रेशन केले होते. 10-17 वयोगट किड्स गट, महिला खुला गट, पुरुष सिनिअर गट, पुरुष मास्टर्स गट, पुरुष खुला गट अशा पाच विभागांत सायकलपटू विभागलेले होते. King of Kumbharli Cycle Race concludes
यावर्षी प्रथमच 8 शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सायकलपटू, तसेच 33 राज्य/राष्ट्रीय खेळाडू, 15 हून अधिक आयर्नमन, 5 आशिया चॅम्पियनशिप खेळलेले खेळाडू यांची मांदियाळी चिपळूण नगरीमधे भरली होती. किंग ऑफ कुंभार्ली या रेसच्या चौथ्या पर्वाचे विशेष आकर्षण म्हणजे सर्व कॅटेगरीतील प्रत्येक प्रथम क्रमांकासाठी पाच फूट उंचीची भव्य ट्रॉफी होती. त्यामुळे ती मिळविण्यासाठी सर्व सायकलपटू मध्ये जोरदार चुरस अपेक्षित होती. King of Kumbharli Cycle Race concludes


मा. मुख्याधिकारी श्री. विशाल भोसले साहेबांच्या हस्ते झेंडा दाखवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सर्व सायकलपटू कुंभार्ली घाटमाथ्याच्या दिशेने रवाना झाले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी टाळ्या वाजवून सायकलस्वारांना प्रोत्साहीत केले. हौशी ढोलपथकांच्या तालावर सायकलस्वारांनी पोफळी पर्यंत अत्यंत वेगाने मार्गक्रमणा केली. एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी लागलेल्या चुरशीने उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडले. पोफळी कमानीपासून सायकलपटूंचा कस बघणारी चढाई सुरु झाली आणि आत्तापर्यंत थोडं मागे थांबून आपली उर्जा राखलेल्या सायकलस्वारांनी बघता बघता त्या जत्थ्यातून आपल्या सायकली पुढे दामटल्या आणि इतर स्पर्धकांवर निर्विवादपणे वर्चस्व मिळविले. 12 किमी खडी चढण असलेल्या कुंभार्ली घाटासाठी पुढे असणा-या मोजक्या सायकलस्वारांमधे देखील किंग ऑफ माउंटन या पारितोषिकासाठी चढाओढ होती. या संपूर्ण 29 किमी साठी सुमारे 750 मीटर्स पेक्षा जास्त उंची गाठत या सायकलस्वारांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलले आणि हेही पारितोषिक पटकावले. King of Kumbharli Cycle Race concludes
गट निहाय प्रथम तीन सायकलस्वारांची नावे
10-17 किड्स –
प्रथम क्रमांक – आर्यन सुनिल माळगे (१तास:११मिनिटे:१४सेकंद:३७२मिलीसेकंद)
द्वितीय क्रमांक – यश सागर देवकुळे (१तास:११मिनिटे:१४सेकंद:३७३मिलीसेकंद)
तृतीय क्रमांक – आर्यन संदीप जाधव (१तास:११मिनिटे:१४सेकंद:८७२मिलीसेकंद)
१२ किमी किंग ऑफ माउंटन – आर्यन सुनिल माळगे (३९मिनिटे:२०सेकंद)
महिला खुला गट –
प्रथम क्रमांक – जुई गजानन नारकर (१तास:१५मिनिटे:४८सेकंद:३५४मिलीसेकंद)
द्वितीय क्रमांक – योगेश्वरी महादेव कदम (१तास:१९मिनिटे:४१सेकंद:३४०मिलीसेकंद)
तृतीय क्रमांक – राजनंदिनी सोमवंशी (१तास:१९मिनिटे:४१सेकंद:५६९मिलीसेकंद)
१२ किमी किंग ऑफ माउंटन – जुई गजानन नारकर (४३मिनिटे:५२सेकंद)
पुरुष सिनिअर गट –
प्रथम क्रमांक – श्री. महेश किणी (१तास:१६मिनिटे:०७सेकंद:८५३मिलीसेकंद)
द्वितीय क्रमांक – संतोष पवार (१तास:१७मिनिटे:१०सेकंद:५९५मिलीसेकंद)
तृतीय क्रमांक – आस्ताद पालखीवाला (१तास:१७मिनिटे:४३सेकंद:०८८मिलीसेकंद)
१२ किमी किंग ऑफ माउंटन – महेश किणी (४४मिनिटे:४६सेकंद)
पुरुष मास्टर्स गट –
प्रथम क्रमांक – राहूल शिरसाट (१तास:०९मिनिटे:५९सेकंद:९१८मिलीसेकंद)
द्वितीय क्रमांक – अनूप पवार (१तास:११मिनिटे:०३सेकंद:५९०मिलीसेकंद)
तृतीय क्रमांक – अर्जून पाटील (१तास:११मिनिटे:०३सेकंद:५९०मिलीसेकंद)
१२ किमी किंग ऑफ माउंटन – राहूल शिरसाट (३८मिनिटे:१६सेकंद)
पुरुष खुला गट –
प्रथम क्रमांक – सिद्धेश अजित पाटील (१तास:०३मिनिटे:२९सेकंद:१९५मिलीसेकंद)
द्वितीय क्रमांक – सूर्या थातू (१तास:०३मिनिटे:२९सेकंद:९५५मिलीसेकंद)
तृतीय क्रमांक – निहाल मुसा नदाफ (१तास:०३मिनिटे:३१सेकंद:४६२मिलीसेकंद)
१२ किमी किंग ऑफ माउंटन – सिद्धेश पाटील (३४मिनिटे:३३सेकंद)
स्पर्धा संपल्यानंतर चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री. शेखर निकम सर यांच्या हस्ते सर्व स्पर्धकांना गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभात चिपळूण सायकलिंग क्लब तर्फे श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सायकलपटूंचा मा. आमदार श्री. शेखर निकम सर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. King of Kumbharli Cycle Race concludes


यावेळी चिपळूण डिवायएसपी श्री. राजमाने साहेब, विनती ऑरगॅनिक्सचे श्री. सुमेरजी तारे, एक्सेल इंडस्ट्रीजचे श्री. आनंद पाटणकर, डॉ. अब्बास जबले, डॉ. गोपीनाथ वाघमारे, पु.ना.गाडगीळचे श्री. मयूर सुर्वे, श्री.प्रथमेश नामजोशी, श्री. अनिरुद्ध निकम, प्रसिद्ध यू ट्यूबर श्री. महेश दाभोळकर, मेनेकी ॲबसोल्यूटच्या प्रिती गुप्ता, सह्याद्री क्लासिकचे डॉ. आदित्य पोंक्षे, काळकाई ॲग्रोचे नितिश पाटणे, सायक्लॉजिस्ट – पुणे चे श्री.अभिजीत लोकरे, फय्याज सायकलचे श्री. अकिल सय्यद तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. King of Kumbharli Cycle Race concludes
सहभागी स्पर्धकांनी चिपळूण सायकलिंग क्लबच्या उत्कृष्ट आयोजना बाबत भरभरून प्रतिक्रिया दिल्या तर अनेकांनी लवकरच ही देशातील अग्रगण्य सायकल स्पर्धा होईल असा विश्वास व्यक्त केला. सदर स्पर्धेसाठी प्रांताधिकारी श्री. लिगाडे साहेब, डिवायएसपी श्री. राजमाने साहेब, चिपळूण पोलिस निरिक्षक श्री. मेंगडे साहेब, शिरगाव पोलिस निरिक्षक श्री. भरत पाटील साहेब व सर्व पोलीस कर्मचारी यांचे उत्तम सहकार्य लाभले. King of Kumbharli Cycle Race concludes


चिपळूण सायकलिंग क्लब पर्यावरण रक्षणासाठी नेहमीच सजग असतो. त्यामुळे स्पर्धकांनी वापरलेल्या पाण्याच्या बाटल्या स्वयंसेवकांनी लगेचच गोळा केल्या. याकामी चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेची दरवर्षी मोलाची मदत होते. बाटल्या गोळा करणे, वाहतूक करणे आणि त्या रिसायकल करणे ही सर्व जबाबदारी सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेचे संस्थापक व ज्येष्ठ निसर्गमित्र श्री. भाऊ काटदरे आणि त्यांचे सर्व स्वयंसेवक आपल्या खांद्यावर घेतात. चिपळूण सायकलिंग क्लबचे अध्यक्ष श्री. विक्रांत आलेकर यांनी सर्व देणगीदार, स्पर्धक, सह्याद्री निसर्ग मित्र, स्पर्धकांना शुद्ध पाणी वितरण करणाऱ्या चिपळूण तालुका स्पोर्ट्स अकादमीचे स्वयंसेवक तसेच चिपळूण सायकलिंग क्लबचे सर्व सभासद व स्वयंसेवक यांचे आभार मानले. King of Kumbharli Cycle Race concludes