कोल्हापूरात शाळीग्राम व सौ. प्रतिभा खातूंचा गौरव
गुहागर, ता. 13 : कोकणातील घराघरात पोचलेल्या गुहागर मधील खातू मसाले उद्योग समुहाला आयडॉल ऑफ महाराष्ट्र (Khatu Masale Idol of Maharashtra) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोकण विभागासाठीच्या या पुरस्काराचे वितरण नुकतेच कोल्हापूरमध्ये झाले. खातू मसाले उद्योग समुहाचे संस्थापक शाळीग्राम तथा बंधु खातू आणि सौ. प्रतिभा खातू यांना सुप्रसिध्द महाराष्ट्रीय हॉटेल व्यावसायिका जयंती कठाळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. Khatu Masala Idol of Maharashtra

गणेशोत्सवाच्या प्रारंभी कोल्हापूरमधील हॉटेल सयाजीमध्ये आयडॉल ऑफ महाराष्ट्र (फूड ॲण्ड रेस्टॉरंट) हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला पूर्णब्रह्म या महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतिचा प्रसारासाठी वाहिलेल्या हॉटेल उद्योगाच्या संस्थापिका जयंती कठाळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. Khatu Masala Idol of Maharashtra
परिचय जयंती कठाळे यांचा
मुळच्या नागपूरच्या असलेल्या जयंती कठाळे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. इन्फोसिस या कंपनीमध्ये नोकरी करताना त्यांची बदली बंगळुरमध्ये झाली. तेथे महाराष्ट्रीयन जेवण मिळत नसल्याने त्यांच्या मनात अस्सल मराठी खाद्यसंस्कृतीचा परिचय देणारे हॉटेल उभे करण्याचा विचार आला. त्यातूनच 2012 मध्ये बंगळुरूमध्ये पूर्णब्रह्म या नावाने एक छोटे उपहारगृह सुरु केले. आज भारतासह, युएसए, मॉरिशिअस, युएई येथे 14 हॉटेलची साखळी त्यांनी उभी केली आहे. ‘मनस्विनी फुड्स प्रायव्हेट लिमिटेड’चा पूर्णब्रह्म या प्रकल्पाद्वारे जगभरात मराठी खाद्यपदार्थांची गुणवत्तापूर्ण उपहारगृहे उभारणे व मराठी खाद्यसंस्कृती सर्वदूर पोहचविणे हे त्यांचे स्वप्न आहे. Khatu Masala Idol of Maharashtra

Khatu Masale Idol of Maharashtra
आयडॉल ऑफ महाराष्ट्र (फुड ॲण्ड रेस्टॉरंट) या पुरस्कारासाठी खातू मसाले उद्योगची निवड दै. सकाळने केली होती. गुहागरमधील शाळीग्राम खातू यांनी अनेक संकटांवर मात करत शुन्यातून खातू मसाले उद्योग (Khatu Masale Udyog) उभा केला. मसाल्यांच्या विविध उत्पादनांबरोबरच मोदक पीठ, मेतकुट, वडा पीठ अशी खास कोकणातील चवीची उत्कृष्ट उत्पादने ही या उद्योगात घेतली जातात. पारंपरिक चवीची गुणवत्तापूर्ण उत्पादने ही या उद्योगाची खासियत आहे. स्थानिक महिला व तरुणांना केवळ रोजगार दिला नाही तर उद्योगवाढीसाठी प्रशिक्षितही केले. मुंबईसह कोकणाबरोबर ॲमेझॉनद्वारे देशातील विविध शहरात आणि परदेशातही खातू मसाले उद्योगाच्या उत्पादनांची विक्री होते. या वैशिष्ट्यांमुळेच सकाळ माध्यम समुहातर्फे खातू मसाले उद्योगचे संस्थापक शाळीग्राम तथा बंधु खातू आणि सौ. प्रतिभा खातू यांना गौरविण्यात आले. Khatu Masala Idol of Maharashtra
या उद्योगाचा सुरूवातीपासूनचा प्रवास वाचण्यासाठी खातू मसाले उद्योग इथे क्लिक करा
या कार्यक्रमाला सकाळ माध्यम समुहाचे (Sakal Media) संचालक संपादक श्रीराम पवार, कोल्हापूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव, सरव्यवस्थापक रवींद्र रायकर, कोल्हापूरमधील हॉटेल व्यावसायिक आदी मान्यवर उपस्थित होते. Khatu Masala Idol of Maharashtra Idol of Maharashtra
सकाळ माध्यम समुहाला 90 वर्ष पूर्ण झाली. तसेच यावर्षी देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या निमित्त सकाळ माध्यम समुहातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना आयडॉल ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. Khatu Masala Idol of Maharashtra

गुहागरमधील प्रभावशाली स्त्री म्हणून यापूर्वी जिल्हा परिषदेच्या दोन वेळा सदस्य राहीलेल्या, उत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य या पुरस्काराने सन्मानित झालेल्या वेळणेश्र्वरच्या सौ. नेत्रा ठाकूर यांचा सन्मान दै. सकाळने केला. तसेच गौरव भुमिपुत्रांचा या क्षेत्रात वारकरी संप्रदायाशी अनेक वर्ष जोडले गेलेले, एम.एम.एस. या व्यवसायामधुन रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यात व्यापार करणारे, अनेकांना रोजगार देणारे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे मा. जिल्हा संघचालक असलेल्या मोहन संसारे यांना आयडॉल ऑफ महाराष्ट्र (भुमिपुत्र) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. Khatu Masala Idol of Maharashtra
