अवघ्या चार वर्षात मिळवले यश
गुहागर, ता. 21 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था रत्नागिरी जिल्हा यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या कोकण विभागात प्रथम क्रमांकाच्या दिपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण ग्रिनलिप रिसाँर्ट येथे १९ सप्टेंबर २०२२ रोजी काकासाहेब कोयटे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या हस्ते, सौ.सुरेखा लवांडे सिईओ, दिपक पटवर्धन तज्ञ संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरीचे सर्व संचालक व सिईओ उपस्थित होते. सहकार क्षेत्रात नवीनच असणा-या या संस्थेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे सर्व सहकारी क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Kharvi Patsanstha Deepstam Award
सहकार क्षेत्रातील जुजबी माहिती असताना २०१९ साली स्थापन झालेल्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी या संस्थेने सभासदांची विश्वासाहर्ता वाढवून ग्राहकांचा आर्थिक विकास साधत प्रगतीपथावर असणारी संस्था म्हणून अल्पावधीतच नावारूपाला आली. Kharvi Patsanstha Deepstam Award

खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च २०२२ अखेर केवळ ४० महिन्याच्या कार्यकाळात १८ लाख २२ हजाराचा नफा प्राप्त करत ‘अ’ वर्ग प्राप्त केला. ग्राहकांना नियोजनबद्ध, नम्र व जलद सेवा, सहकार क्षेत्रातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी, सभासदांच्या हिताला प्राधान्य, ठेवीदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त मोबदला, शंभर टक्के कर्ज वसूलीसाठी प्रयत्न, आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने आपला आर्थिक व्यवहार वर्धिष्णू केला. Kharvi Patsanstha Deepstam Award

संस्थेची मार्च २०२२ अखेर ३९४७ सभासद संख्या, ०५ कोटी ६२ लाखाच्या ठेवी, ०४ कोटी ४० लाखांची कर्जे, ०२ कोटी ४६ लाखाची गुंतवणूक, ७ कोटी १६ लाखांचे खेळते भांडवल, १ कोटी १२ लाख स्वनिधी, ६१.१४% सी. डी.रेशो, ९५.०६% वसुली.१००% सोनेतारण कर्ज वसुली. या आर्थिक वर्धिष्णू वाटचाळीमुळे राज्यातील काही निवडक संस्थामध्ये खारवी समाज पतसंस्थेच्या समावेश होत आहे. या पतसंस्थेने सलग ४ वर्षे ‘अ’वर्ग प्राप्त केला. आदर्श प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात नफा असणारी संस्था अशा तिची ओळख आहे. Kharvi Patsanstha Deepstam Award

त्यामुळेच चार वर्षांइतक्या अल्पकालावधीत खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी यांनी केलेली प्रगतीची नोंद महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.ने घेतली. राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार २०२२, गट क्र १ मध्ये १ ते १० कोटी ठेवी असणा-या गटांमध्ये कोकण विभागांमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कारासाठी समावेश झाला. Kharvi Patsanstha Deepstam Award
