रसायनशास्त्र विभागातील द्वितीय व तृतिय वर्ष वर्गातील ३२ विद्यार्थी सहभागी
गुहागर, ता. 28 : येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयातील (Khare Dhere Bhosle College) रसायनशास्त्र विभागाने नुकतीच खेड लोटे परशुराम येथे औद्योगिक भेट दिली. . या औद्योगिक भेटीसाठी रसायनशास्त्र विभागातील द्वितीय आणि तृतिय वर्ष वर्गातील ३२ विद्यार्थी सहभागी झाले होते. Khare Dhere Bhosle College’s Industrial Visit


या भेटीमध्ये इंडस्ट्री मधील Research & Development, Quality Assurance आणि Quality Control या विभागातील कामाची सविस्तर माहिती श्री. महेश पेंडसे आणि श्री. फुले यांनी दिली. Quality Control विभागात श्री. शेळके यांनी विद्यार्थ्यांना High Performance Liquid Chromatography(HPLC), Gas Chromatography(GC) या साधनांची ओळख आणि प्रात्यक्षिक करून दाखवले. इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक विभागात योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यावी याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. Khare Dhere Bhosle College’s Industrial Visit


पदवी अभ्यासक्रमांमध्ये औद्योगिक भेटी हा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक आवश्यक भाग आहे. परस्परसंवादी शिक्षणाचा एक भाग असल्याने अशा शैक्षणिक भेटी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित सैद्धांतिक संकल्पनेच्या व्यावहारिक दृष्टीकोनासह वास्तविक कामकाजाच्या वातावरणाचा मोठा परिचय देतात. या व्यतिरिक्त, औद्योगिक भेटी सैद्धांतिक शिक्षण आणि व्यावहारिक एक्सपोजरमधील वाढणारी दरी कमी करतात. विद्यार्थ्यांना कामाच्या ठिकाणी विविध व्यवसाय ऑपरेशन्स आणि प्रक्रियांसाठी इनपुट आणि आउटपुट ओळखण्यासाठी प्रथम हाताने एक्सपोजर देतात. वर्गातील शिक्षणाच्या पलीकडे जाण्याच्या हेतूने, औद्योगिक दौरे विद्यार्थ्यांना बाजारातील सध्याचे ट्रेंड, उद्योगाची भविष्यातील परिस्थिती आणि उद्योगात लागू होत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल शिक्षण देऊन सर्वांगीण विद्यार्थ्यांच्या विकासात मोठा हातभार लावतात. Khare Dhere Bhosle College’s Industrial Visit
इंडस्ट्रीबद्दल खरे ढेरे भोसले महाविद्यालयातील (Khare Dhere Bhosle College) विद्यार्थ्यांचे असणारे कुतूहल आणि शंकाचे झालेले निरसन पाहायला मिळाले. सदर औद्योगिक भेटीस एक्सेल इंडस्ट्रीचे (Excel Industry) मॅनेजर विश्वनाथ वैद्य यांचे या भेटीस सहकार्य मिळाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. सावंत आणि रसायनशास्त्रचे विभागप्रमुख प्रा. ए. एस. हिरगोंड यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. प्रवीण कदम, प्रा. प्रमोद आगळे यांच्याकडून औद्योगिक भेटीचे आयोजन आणि नियोजन करण्यात आले. Khare Dhere Bhosle College’s Industrial Visit

