• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खरे- ढेरे- भोसले महाविद्यालयात कविसंमेलन संपन्न

by Ganesh Dhanawade
February 28, 2023
in Guhagar
93 2
0
Khare-Dhare- Bhosle College
186
SHARES
530
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 28 : खरे- ढेरे- भोसले महाविद्यालयातील (Khare-Dhare- Bhosle College) मराठी भाषा व वाड्मय मंडळाच्या वतीने मराठी गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात चिपळूणचे प्रसिद्ध शाहीर शाहीद खेरटकर, कवी श्री. राजेंद्र आरेकर, कवी ज्ञानेश्वर झगडे उपस्थित होते. Poetry Conference at KDB College

या कवी संमेलनात एका पेक्षा एक अशा सुंदर कविता मराठीच्या गौरवाच्या निमित्ताने सादर झाल्या. यात शाहीर शाहीद खेरटकर यांनी बहारदार आवाजात शाहिरी कविता सादर केल्या. ” यात ना मंदिराची ओढ ना मज्जीतिची ओढ “ही कविता काळजाचा ठाव घेऊन गेली. “मी कर्म शोधतो आहे, ते मर्म शोधतो आहे, सौदागरा तुला दिसला, तो धर्म शोधतो आहे” या ओळींमधुन नेमके, उपहासात्मक, सादरीकरण झाले. त्यांनी अनेक प्रेरणादायी कविता सादर केल्या. छत्रपती शिवरायांवरची कविता चांगलीच गाजली. “बघ पुन्हा एकदा उघडून माझं चरित्र, बघ जमतंय का करायला काटेकोर आचरण.., नायतर खुंटीची तसबीर, चौकातले पुतळे, घोषणा, नारे आणि तो भगव्याचा स्वाभिमान, ती चंद्रकोर तो रुबाब…सारं काही निरर्थक….मला पुन्हा माझं तेच स्वराज्य हवंय….आणि तू बनायला हवास माझा सच्चा मावळा… माझे विचार मनापासून जपणारा..!! समतेचा आणि मानवतेचा विचार पेरणारा..!! डोक्यावर नको मला डोक्यात ठेवणारा…!!!” ज्येष्ठ कवी राजेंद्र आरेकर यांनी सुंदर, तरल, भावनाशील, कविता सादर केल्या. यात आई या विषयावरच्या दोन कवितांनी अंतर्मुख केले. त्यांची धक्का तंत्रातली “माझ्याच लेकरांची आई” ही कविता हास्य विनोदाचे तुषार उडवून गेली. त्यांच्या बहारदार प्रेम कवितांनी चांगली रंगत आणली. कोकणच्या कवितांतून कोकणचे सुंदर गौरवीकरण आले. Poetry Conference at KDB College

Khare-Dhare- Bhosle College

“माझा कोकण साजिरा, दर्याखोर्यांनी भरला, माड बनांचे कौतुक करी सागर तो निळा” कोकणची संस्कृती या कवितेने उभी केली. कवी ज्ञानेश्वर झगडे यांनी “आम्ही कोकणचं राजं हाय वनवासी” ही कविता सादर केली. कोकणची व्यथा या कवितेतून मांडली. या कवितेवर रसिकांनी ताल धरला.
“आमच्या कातलावर कंपनी परदेशी
सांग वीज मिलतीया ती कोणाशी
तिन्ही सांजभरात आम्ही अंधारात
जलं मेणबत्ती आमच्या दाराशी”अशी चिमटे काढणारी ही कविता.”बापू बापुडे” ही महात्मा गांधी यांच्यावरील कविता सुंदर शैलीत सादर केली. “माय -बाप” या कवितेतून संस्कारांची महती त्यांनी सांगीतली. “माझी छत्री” ही विनोदी कविता ढंगदार सादर केली. उत्तरोत्तर या कविसंमेलनात रंगत भरत गेली. Poetry Conference at KDB College

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

कार्यक्रमाचे प्रास्तविक मराठी विभाग प्रमुख साहित्यिक डॉ. बाळासाहेब लबडे यांनी केले. यात सर्वांचा परिचय करून दिला. मराठी भाषेच्या विकासाचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. पी. एस. सरपोतदार होते. त्यांनी मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी चांगले वाचन करून साहित्यनिर्मिती करण्याचे आवाहन केले. आभार कु. दिप्ती महाजन यांनी मानले. या कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घेतला. Poetry Conference at KDB College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPoetry Conference at KDB CollegeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share74SendTweet47
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.