शेतकऱ्यांना होणार थेट फायदा; खादी ग्रामोद्योगाचे सभापती रवींद्र साठे
गुहागर, ता. 18 : राज्यातील मध उद्योगाला चालना मिळावी आणि जास्तीत जास्त लोकांनी मध व्यवसायाकडे वळावे यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने मध व मेण खरेदीचा हमीभाव जाहीर केला आहे. अशी माहिती राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली आहे. Khadi village industry increased the procurement rate of honey
यावेळी श्री साठे म्हणाले “मंडळाची मध केंद्र योजना राज्यात सुरु आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थीना मधमाशा पालनाचे दहा व वीस दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. तसेच पन्नास टक्के अनुदानात मधमाशांच्या वसाहतीसह मधपेट्या दिल्या जातात आणि उत्पादित मध व मेण खरेदीची हमी देखील दिली जाते. या योजनेच्या प्रचार प्रसिद्धी साठी मंडळाने राज्यात मागील वर्षात 64 जनजागृती मेळावे घेतले. चालू आर्थिक वर्षात शंभर मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. Khadi village industry increased the procurement rate of honey

देशात कोणतेही राज्य सरकार मध व मेण खरेदीची हमी देत नाही. मात्र आपल्या राज्यात केवळ हमीच नाही तर सर्वात जास्त भावाने मधमाशापालनातील उत्पादने मधमाशा पालकांकडून खरेदी केली जातात. सेंद्रिय मध हा 500 रुपये किलो तर पश्चिम घाटातील सातेरी जातीच्या मधमाशांचा मध हा 400 रुपये प्रति किलोने खरेदी केला जात आहे. मेण खरेदीचा हमी भाव देखील मंडळाने जाहीर केला आहे. 300 रुपये प्रति किलो दराने मंडळ मेण खरेदी करीत आहे. Khadi village industry increased the procurement rate of honey
खादी व ग्रामोद्योग मंडळ मधपाळ शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या मधाचे उत्कृष्ट ब्रॅंडिंग व पॅकेजींग करून ‘मधुबन’ या नावाने हा मध बाजारात विकला जातो. या मधामध्ये जांभूळ मध, सूर्यफूल मध, सेंद्रिय मध, ओव्याचा मध अशी प्रतवारी करून विक्री करण्यात येत असल्याने या मधास चांगली मागणी आहे.” शेती पिक उत्पादनात भरघोस वाढ करण्याची क्षमता मधमाशा पालनात आहे. तसेच मध व मेण खरेदीची हमी देखील देण्यात मंडळाने घेतली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी व बेरोजगार तरुण व महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन मधमाशा पालन करावे, असे आवाहन देखील श्री साठे यांनी केले आहे.Khadi village industry increased the procurement rate of honey
