आंतरमहाविद्यालयीन उत्तर रत्नागिरी झोनच्या सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन
गुहागर ता. 06 : ५५ व्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन उत्तर रत्नागिरी झोनच्या सांस्कृतिक स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच ज्ञानदीप महाविद्यालय, खेड येथे पार पडली. यामध्ये खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाची (Khare-Dhere-Bhosle College) टीम सहभागी झाली होती. फाईन आर्ट, संगीत, गायन, लिटररी यासारख्या विविध विभागातील स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ सादरीकरण केले. या स्पर्धेतील तीन प्रकारांमध्ये विद्यार्थ्यानी सुयश संपादन केले. KDB College success in preliminary round
या स्पर्धेतील भारतीय सुगम गायन स्पर्धेत कु. मयुरेश गाडगीळ (द्वितीय वर्ष कला) यास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. कथाकथन हिंदी या स्पर्धेत कु. सोहम खरे (प्रथम वर्ष वाणिज्य) यास उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला. वक्तृत्व इंग्रजी या स्पर्धेत कु.समरीन बोट (एफ.वाय.बी. एसस्सी) हिला उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब लबडे व डॉ. रामेश्वर सोळंके आणि पालक सौ. मीरा गाडगीळ यांचे मार्गदर्शन लाभले. या तीनही विद्यार्थांची निवड मुंबई विदयापीठ आंतर महाविद्यालयीन अंतिम फेरीसाठी झाली आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक आणि अभिनंदन संस्था पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. विराज महाजन आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे. KDB College success in preliminary round