गुहागर, ता. 06 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाची (Khare-Dhere-Bhosle College) रसायनशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु. कोमल अरुण गुरव रा. गुहागर हि महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परिक्षा (सेट )उत्तीर्ण झाली आहे. त्याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन तिचा सत्कार करण्यात आला. KDB College student success in set exam
खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाची विद्यार्थिनी कोमल अरुण गुरव सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत यु.जी.सी. नवी दिल्ली मान्यता प्राप्त नोडल एजन्सी आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परिक्षा (सेट )उत्तीर्ण झाली आहे. खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातून शिकून सेट परिक्षा देणारी ही पहिली विद्यार्थीनी आहे. म्हणून महाविद्यालयाच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला. KDB College student success in set exam
यावेळी मनोगत व्यक्त करताना कु.कोमल गुरव हिने विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सातत्य पूर्ण ध्येयाचा पाठपुरावा केला तर कोणतेही ध्येय अवघड नाही असे मत व्यक्त केले. यावेळी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.अनिल हिरगोंड, सहा.प्रा.प्रविण कदम, सहा.प्रा.प्रमोद आगळे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री पद्मनाभ सरपोतदार व इतर प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. KDB College student success in set exam