लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्यावतीने वरवेलीतील ममता विचारे यांना जाहीर
गुहागर, ता. 17 : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर वाचनालयाच्यावतीने गुहागर तालुक्यातील वरवेली गावच्या सौ. ममता विचारे यांच्या “सूर्योदय” संग्रहाला कवी आनंद पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. हा पुरस्कार 21 जानेवारी रोजी वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात सायंकाळी ६ वा. वितरण होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे. Kavi Anand Award for “Suryodaya” anthology
चिपळूणचे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर वाचनालय हे कोकणच्या सांस्कृतिक घडामोडीचा केंद्रबिंदू आहे. 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबरोबरच अनेकविध संमेलनाचे आयोजन या ग्रंथालयाने केले आहे. साहित्य कार्यासाठी, सामाजिक कार्यासाठी व वाचन चळवळीतील योगदानासाठी व्यक्ती तसेच संस्थाना विविध पुरस्कार प्रदान करून वाचनालयाच्या वतीने गौरविण्यात येते. Kavi Anand Award for “Suryodaya” anthology
सन 2022-23 यावर्षीच्या कवितासंग्रहासाठी असणारा “कवी आनंद” हा पुरस्कार सौ. ममता विचारे यांच्या “सूर्योदय” या दर्जेदार काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. सौ. ममता विचारे या गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. या शाळेमध्ये त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीरीत्या राबवले आहेत. एक हुशार व अभ्यासू शिक्षिका या आंतरराष्ट्रीय शाळेला मिळाल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. Kavi Anand Award for “Suryodaya” anthology