• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

काताळे ग्रामपंचायत इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न

by Guhagar News
March 5, 2025
in Guhagar
96 1
0
Katale Gram Panchayat Building Inauguration Ceremony
189
SHARES
540
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

माजी आमदार डॉ.विनय नातू, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच सौ प्रियांका सुर्वे यांच्या हस्ते

गुहागर, ता. 05 : तालुक्यातील काताळे, तवसाळ, तवसाळ खुर्द या तीन महसुली गावांचा समावेश असणाऱ्या काताळे ग्रामपंचायतीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन उद्घाटन सोमवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ३ वाजता माजी आमदार डॉ.विनयजी नातू, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच सौ प्रियांका सुर्वे यांच्या हस्ते संपन्न झाले. Katale Gram Panchayat Building Inauguration Ceremony

Katale Gram Panchayat Building Inauguration Ceremony

२०१० साली माजी आमदार डॉ.विनयजी नातू यांच्या विशेष प्रयत्नाने पडवे ग्रामपंचायतच्या पडवे आणि काताळे अशा २ ग्रामपंचायती निर्माण झाल्या. ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यानंतर ज्या महसूल गावाची लोकसंख्या जास्त त्याप्रमाणे नवीन ग्रामपंचायतला काताळे हे नाव मिळाले आणि काताळे गावातील सर्व ग्रामस्थानी मोठ्या मनाने ग्रामपंचायत कार्यालयाला विना मोबदला जागा आणि विना मोबदला इमारत तयार करून दिली. आज १५ वर्षानंतर काताळे ग्रामपंचायतीसाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदयजी सामंत, माजी आमदार डॉ.विनयजी नातू, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निलेश सुर्वे या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने या ग्रामपंचायतीला 22 लाखाचा निधी जिल्हा नियोजन जनसुविधा योजनेतुन प्राप्त झाला. अधिक ३ लाख रुपये ग्रामनिधी अशी 25 लाखाची दिमाखदार इमारत काताळे महसुली गावात कै.जयंत यशवंत जुवेकर यांनी विना मोबदला दिलेल्या ४ गुंठे जमिनीमध्ये उभी राहिली. या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. प्रियांका सुर्वे, उपसरपंच प्रसाद सुर्वे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी यांनी याकरिता विशेष पाठपुरावा केला होता. Katale Gram Panchayat Building Inauguration Ceremony

Katale Gram Panchayat Building Inauguration Ceremony

या नुतन इमारतीचे उद्घाटन हे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्मा. उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते करण्याचे निश्चित होते पण त्याच दिवशी अधिवेशनाची सुरुवात झाल्याने स्वतः मंत्रिमहोदय या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.काताळे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे माजी आमदार डॉ.विनयजी नातू यांनी श्रीफळ वाढवून, सरपंच सौ प्रियांका सुर्वे यांनी फीत कापून तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर यांनी नामफलकाचे अनावरण करून एकत्रितपणे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. Katale Gram Panchayat Building Inauguration Ceremony

Katale Gram Panchayat Building Inauguration Ceremony

यावेळी प्रास्ताविकामध्ये काताळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य निलेश सुर्वे यांनी ग्रामपंचायतीचे विभाजन, स्थापनेपासून, ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन होईपर्यंतचा सर्व इतिहास मान्यवर आणि उपस्थितांसमोर ठेवला. यावेळी या १५ वर्षाच्या कालखंडामध्ये काताळे ग्रामस्थ यांनी विना मोबदला स्वखर्चाने बांधून दिलेली इमारत आणि १५ वर्षे वापरावयास दिलेले कातळे बारस्कर वाडीचे सभागृह याबद्दल सुद्धा ऋण व्यक्त केले. तर या ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी एका भव्य अशा सभागृहाची आवश्यकता असल्याचे सरपंच सौ प्रियांका सुर्वे यांनी मनोगत व्यक्त करताच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर यांनी लवकरच सरपंच महोदयांची ही मागणी आपण पूर्ण करणार असल्याचे सांगितले. Katale Gram Panchayat Building Inauguration Ceremony

माजी आमदार डॉ.विनय नातू यांनी कै.जयंत यशवंत जुवेकर यांनी विना मोबदला दिलेल्या जमिनीमध्ये दिमाखदारपणे उभी राहिलेल्या या इमारतीबद्दल सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचे कौतुक करत असतानाच ही ग्रामपंचायत इमारत पंचक्रोशीतील एक मार्गदर्शक केंद्र बनेल, रोजगाराचे केंद्र बनेल, रोजगार निर्मितीचे केंद्र बनेल, पर्यटनकांसाठी मदतनीस म्हणून काम करून पंचक्रोशीत पर्यटनाच्या माध्यमातून कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करतील. Katale Gram Panchayat Building Inauguration Ceremony

या ग्रामपंचायतीच्या उद्घाटनासाठी सर्व शासकीय अधिकारी या ग्रामपंचायतीच्या उद्घाटनाला उपस्थित राहिले नाही किंवा त्याने आपला कोणी प्रतिनिधी पाठवला नाही याबद्दल नाराजी व्यक्त करत असतानाच  ग्रामपंचायती सारख्या शासकीय इमारतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसाल तर याबाबत आपल्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी डॉ.विनय नातू यांनी सांगितले. आपण शासनाचा पगार घेता आणि वैयक्तिक कोणाचे जर काम करत असाल तर याची गंभीर दखल यापुढे घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले. Katale Gram Panchayat Building Inauguration Ceremony

तालुक्यात फिरत असताना अनेक विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचे फलक पाहतो यावरती फक्त एकाच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षाचे नाव पहावयास मिळते मात्र जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पद भूषवणाऱ्या महेश नाटेकर यांचे नाव कुठेच दिसत नसल्याची खंत व्यक्त करत जिल्हा परिषदेला फक्त एकच अध्यक्ष झाला का ? असा सवाल डॉक्टर नातू यांनी व्यक्त केली. याच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील एक उत्तुंग असं राजकीय व्यक्तिमत्व कै. दिलीप गडदे यांची आठवण काढत असतानाच दिलीप गडदे आणि मी वेगवेगळ्या पक्षात काम करत असलो तरी आमचे ऋणानुबंध हे राजकारणाच्या पलीकडे असल्याचे सांगत काताळे ग्रामपंचायतीच्या इथून पुढच्या कारभारास अनेक शुभेच्छा दिल्या. Katale Gram Panchayat Building Inauguration Ceremony

Katale Gram Panchayat Building Inauguration Ceremony

यावेळी व्यासपीठावरती जमिन मालक कै.जयंत यशवंत जुवेकर यांचे नातू जयदीप जुवेकर, गुहागर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सचिन ओक, काताळेचे माजी सरपंच अशोक पवार, शर्वरी कुरटे, संदीप जोशी, तंटामुक्तीचे अध्यक्ष उत्तम पवार, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुभाषशेठ कोळवणकर, व्हाईस चेअरमन रमेश कुरटे, माजी चेअरमन विजय मोहिते, तंटामुक्तीचे ७ वर्ष नेतृत्व करणारे प्रदीप सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश गडदे, तालुका खरेदी विक्री संघ संचालक शाम गडदे, पडवे सरपंच मुजीब जांबारकर, जांभारी सरपंच वनिताताई डिंगणकर, पो.पा. सचिन रसाळ, तवसाळ खुर्द शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश गडदे, तलाठी सचिन परदेसी, ठेकेदार अमोल पाटील, काताळे मरीन सिंडीकेटचे इंद्रनील भाटकर, ॲड .अपुर्वाताई बारगोडे, प्रसिद्ध उद्योजक अरुणशेठ गांधी, संदिप साळवी,आरोग्य सेविका कील्लेकर याचबरोबर कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, प्रभाग समिती अध्यक्ष, ग्रामसंघ अध्यक्ष, बचत गटाचे सर्व प्रतिनिधी, सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, कार्यक्षेत्रातील तीनही महसूल गावांमधील गावचे अध्यक्ष, वाडी प्रमुख, महिला मंडळ अध्यक्ष आदीसह बहुसंख्येने ग्रामस्थ बंधू आणि भगिनी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य मधुकर अजगोलकर यांनी केले. Katale Gram Panchayat Building Inauguration Ceremony

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKatale Gram Panchayat Building Inauguration CeremonyLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet47
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.