गुहागर, ता. 30 : गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात सोमवार दि. 03 ते 07 नोव्हेंबर 2025 या दिवसात कार्तिकोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच शनिवार दिनांक 01 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी व 02 रोजी श्री गजानन महाराज व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्ती स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन देवस्थान अध्यक्षांच्या वतीने करण्यात आले आहे. Kartikotsav at Kopri Narayan Temple Guhagar
दिनांक 01 ते 07 नोव्हेंबर 2025 रोजी स. 6.30 ते 7.30 वाजता श्रींची महापूजा, रात्रौ 9 वाजता आरती व मंत्रपुष्प हे दैनंदिन कार्यक्रम करण्यात येणार आहेत.

गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात शनिवार दि. 01 रोजी रात्रौ 9.30 वाजता कार्तिकी एकादशीनिमित्त वरचापाट ग्रामस्थांचे भजन. रविवार दि. 02 रोजी रात्रौ 9 वाजता श्री गोपाळकृष्ण आरती मंडळ, खालचापाट यांची आरती तसेच रात्रौ 10 वाजता वरचापाट महिला ग्रामस्थांचे भजन सोमवार दि. 03 रोजी रात्रौ 9.30 वाजता गुरुदेवदत्त भजन मंडळ, आंजर्ले यांचे भजन, रात्रौ 10.30 वाजता ह.भ.प. सुमंतबुवा भिडे, मळण यांचे सुश्राव्य किर्तन. मंगळवार 04 रोजी सायं 05 ते 07 वाजता महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम. रात्रौ 10 वाजता स्थानिक कलाकारांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम, बुधवार दि. 05 रोजी रात्रौ 10 वाजता श्री. श्रीनिवास जोशी लिखित “आमदार सौभाग्यवती” हे दोन अंकी नाट्यकलाकृती, गुरुवार दि. 06 रोजी सकाळी 9.30 वाजता पुरुषसुक्त पठण या कार्यक्रमात गुहागर शहरातील सर्व महिला पुरुषांना सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. तसेच रात्रौ 9.30 वाजता डोन्ट मिस ए बीट (ह्रदयाचा ठोका चुकवू नका) या कार्यक्रमासाठी ह्रदयरोगत डॉ. प्रणव शामराज हे मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवार दि. 07 रोजी सकाळी 7.30 वाजता विष्णूयाग, सकाळी 11.30 वाजता तुलसी विवाह, दुपारी 12.30 वाजता महाप्रसाद, रात्रौ 9.15 वाजता ह.भ.प. सुमंतबुवा भिडे, मळण यांचे किर्तन होणार आहे. रात्रौ 10 वाजता पं. गोविंदराव विठ्ठल पटवर्धन संगीत गौरव पुरस्कार 2025 वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रौ 10 वाजता चैतन्य, दापोली निर्मित मराठी गीतांचा गंध स्वरांचा हा बहारदार कार्यक्रम तसेच रात्रौ 12 वाजता लळिताचे किर्तन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी कार्तिकोत्सवातील कार्यक्रमांसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव कोपरी नारायण देवस्थानच्या अध्यक्षांनी केले आहे. Kartikotsav at Kopri Narayan Temple Guhagar
