रत्नागिरी, ता. 12 : १९९० ला रत्नागिरीतून मुंबई व तिथून अयोध्येत निघालो; परंतु आधीच्या ४ ते ५ स्थानकांवर थांबवून पोलिसांनी जबरदस्तीने खाली उतरवले. त्यानंतर तेंदूपत्तीच्या गोदामात रवानगी केली. गोदामाची कच्ची भिंत फोडून अनेक कारसेवकांसोबत आम्हीही पलायन केले. रात्रभर धडपडत अडचणीतून, मिळेल त्या वाटेने अयोध्या गाठली. प्रचंड पोलिस बंदोबस्त, देशभरातून आलेल्या रामसेवकांना आजूबाजूच्या गावातले गावकरी भाजीपुरी, दही असे अगत्याने आणून देत होते. धावपळीत बरोबरचे लोक आणि ग्रुपमधील महिला यांची पांगापांग झाली. तरी सगळे कारसेवक असल्याने भीती वाटली नाही. १९९० मध्ये भगवा झेंडा फडकवला, हे वृत्त कळताच अयोध्येत आनंदोत्सव साजरा केला. २२ जानेवारीला राममंदिर प्राणप्रतिष्ठाना होत असल्याबद्दल प्रचंड अभिमान, आनंद वाटत असल्याचे ज्येष्ठ कारसेविका प्रमिला वैद्य (वय ९२) यांनी सांगितले. Karsevak experience narration and honor program
शहरातील या सर्व कार्यालयातून निवृत्त होऊन ही विविध सामाजिक कार्य करीत राहण्याच्या उद्देशाने हा निवृत्त तरी कार्यरत या ग्रुपची संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली आहे. गेले २ वर्ष या ग्रुपचे कार्य या संकल्पनेनुसार एकजुटीने सुरु आहे. या ग्रुपतर्फे माळनाका येथे वैद्य यांच्या सागरदर्शन निवासस्थानी कारसेविकांचा अनुभव कथन व सन्मानाचा कार्यक्रम झाला. त्या वेळी प्रमिलाताई बोलत होत्या. रत्नागिरीतील प्रमिला वैद्य, कल्पलता भिडे, नीला दात्ये, अलका शहाणे, प्रतिभाताई यांनी कारसेवेतील रोमांचकारी अनुभव सांगितले. Karsevak experience narration and honor program
१९९० ला अनेकांना पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केले. कोणतेही अस्त्र वा शस्त्र जवळ सापडलेले नसताना किंवा काहीही आरोप नसताना पोलिस कसे अटक करू शकतात, याबद्दल त्यांनी कोर्टात स्पष्ट बाजू मांडली याची माहिती कल्पलता भिडे यांनी दिली. कारसेवेला जाणार असल्याने घराबाहेर पोलिस तैनात असताना त्यांनी गुंगारा दिला व छोट्या मुलाला आईकडे ठेवून त्या नाट्यमयरितीने अयोध्येत पोहोचल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशातील लोक भेटले की, महाराष्ट्र म्हटल्यावर आप सिवा (छत्रपती शिवाजी महाराज) के देशसे आये हो, असे म्हणत नमस्कार करत, अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.

प्रतिभाताईंनी सांगितले, १९९२ मध्ये कारसेवेसाठी माहोल तणावाचा; पण आनंद आणि उत्साहाचा होता. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, साध्वी ऋतांबरा, उमा भारती, मुरली मनोहर जोशी असे एकसे एक दिग्गज सातत्याने सुरू असलेल्या भाषणांमधून कारसेवकांना संबोधित करत होते. शिस्त पाळण्याचे व शांतता तसेच संयम राखण्याचे, प्रक्षोभक आचरण न करण्याचे आवाहन सातत्याने करत होते. शिस्तबद्ध कारसेवकांनी गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतली. विवादित ढाचा पडला आणि रामलल्लाची मूर्ती स्थानापन्न झाली. आज मंदिर उभे राहिले आहे, या आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले. Karsevak experience narration and honor program
नीलाताई म्हणाल्या, पूर्वी उत्तर हिंदुस्थान प्रांताबद्दल त्यांच्या मनात स्त्री म्हणून असलेली भीती अकारण होती, हे त्यांनी वेगवेगळ्या चार अयोध्या सेवावारीदरम्यान अनुभवले. तंबूत राहणे, भल्या पहाटे थंडीत उठून शरयू नदीत अंघोळ रामप्रेमापुढे त्रासाचं वाटल नाही. एक गर्भवती महिला कारसेवेसाठी आली होती. तिच्या सासर आणि माहेरच्या लोकांनी तिला अयोध्येत जाण्यासाठी परवानगी दिली होती. राम लल्लाप्रती जनमानसात किती प्रेम आहे, हे दाखवणारी ही एक गोष्ट होती आणि सगळ्यांनी सेवा म्हणून दोन-दोन मुठी वाळू नियोजित मंदिराच्या जागी टाकल्याचा अभिमान वाटतो. Karsevak experience narration and honor program
