• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे पुरस्कार जाहीर

by Guhagar News
September 15, 2022
in Ratnagiri
19 0
0
Karhade Brahmin Sangh Awards Announced
37
SHARES
107
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता.15 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, अर्ज न मागवता कार्यकारिणीतर्फे माहिती मिळवून या पुरस्कारांची निवड केली जाते. या पुरस्कारांचे वितरण वर्षअखेरीस होणार आहे. त्यासंबंधीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. शाल, पुस्तक, रोख रक्कम, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून  देणगीदारांनी दिलेल्या निधीतून या पुरस्कारांचे प्रतिवर्षी वितरण मान्यवरांच्या हस्ते शानदार करण्यात येते. Karhade Brahmin Sangh Awards Announced

कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार विजेत्यांनमध्ये आदर्श कीर्तनकार पुरस्कार ह.भ.प. दत्तात्रेय तथा दत्तराज नरसिंह वाडदेकर (देवरुख), आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार सदानंद रघुनाथ ठाकुरदेसाई (मोरोशी, ता. राजापूर), आदर्श पौरोहित्य पुरस्कार वे. मू. गणेश दत्तात्रय खेर (भू, राजापूर) धन्वंतरी पुरस्कार डॉ. शाम गोपाळराव जेवळीकर (रत्नागिरी), दर्पण पुरस्कार सुरेश वामन सप्रे (देवरुख), उद्योजक पुरस्कार महेश मोहन गर्दे (रत्नागिरी), उद्योगिनी पुरस्कार शिल्पा नितीन करकरे (तुरळ, ता. संगमेश्वर) आणि राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार खो-खो पटू सायली दिलीप कर्लेकर (रत्नागिरी) यांचा समावेश आहे. Karhade Brahmin Sangh Awards Announced

पुरस्कारमूर्तींची थोडक्यात माहिती

Karhade Brahmin Sangh Awards Announced
हभप दत्तराज वाडदेकर

हभप दत्तराज वाडदेकर

हभप दत्तराज वाडदेकर यांनी आतापर्यंत मध्य प्रदेश, गुजरात, कारवार, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रात ७ हजारहून अधिक कीर्तने केली आहेत. १९६२ पासून २०१७ पर्यंत म्हणजे तब्बल ५५ वर्षे कीर्तन सेवा करत आहेत. ४५० हून अधिक व्यसनमुक्ती कार्यक्रम केले आहेत. ते ज्योतिषशास्त्री, वास्तुशास्त्री, खगोलशास्त्र डॉक्टरेट पदवीप्राप्त आहेत. त्यांना भगवान परशुराम पुरस्कार प्राप्त आहे. तसेच आतापर्यंत विविध नामवंत संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. अखिल भारतीय कीर्तन कुलचे १० वर्षे अध्यक्ष, अ. भा. कीर्तन कुलचे १५ वर्षे कार्यवाह, सृष्टी सेवा संस्थेचे संस्थापक सदस्य, देवर्षी नारद कीर्तन कला प्रसारक मंडळचे अध्यक्ष अशी पदे भूषवली आहेत. Karhade Brahmin Sangh Awards Announced

Karhade Brahmin Sangh Awards Announced
वेदमूर्ती गणेश खेर

वेदमूर्ती गणेश खेर

वेदमूर्ती गणेश दत्तात्रय खेर यांनी पौरोहित्य, संस्कृत संवर्धनासाठी विपुल योगदान दिले आहे. राजापूर संस्कृत पाठशाळेत वेदशास्त्रसंपन्न (कै.) पांडुरंगशास्त्री आठल्ये व वेदशास्त्रसंपन्न गजाननशास्त्री मोरेश्वर पाध्ये या दोघा ऋषितुल्य गुरुंकडे ते शिकले. काही वर्षे कोल्हापूर, नंतर मुंबई या ठिकाणी राहून पौरोहित्य केले. ज्या राजापूर वेदपाठशाळेत गुरुजींनी अध्ययन केले त्या ठिकाणी १ ऑक्टोबर १९८७ पासून अध्यापक म्हणून सेवा रुजू केली. १२ ते १३ वर्षात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. सन १९८७ ते १९९६ या कालावधीमध्ये त्यांनी संस्कृत पाठशालेत अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य केले. त्यावेळी १९९० मध्ये कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य ही शाळा पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी केलेलं पठण त्यांनी ऐकलं आणि समाधान व्यक्त करून आशीर्वाद दिले. विशेष म्हणजे या मुलांना शिकविणाऱ्या वे. शा. सं. खेर गुरुजी यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांना शाल देऊन त्यांचा गौरव केला. खेर गुरुजींना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षण मंडळ यांनी उत्कृष्ट संस्कृत अध्यापनाबद्दल मानपत्र देऊन पुरस्कारित केलं आहे. महागणेश सेवा मंडळ, मालवण यांनी खेर गुरुजींच्या कार्याचा गौरव म्हणून मानपत्र देऊन त्यांना पुरस्कार दिला आहे. वे.शा. सं. दत्तात्रय निगुडकर, वे. शा. सं. जनार्दन निगुडकर आणि वे. शा. सं. वासुदेव निगुडकर या त्रैमूर्ती निगुडकर गुरुजी स्मरणार्थ (कै.) दामोदर करंबेळकर स्मृति प्रतिष्ठानकडून अध्यापनातील विशेष कार्यासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. Karhade Brahmin Sangh Awards Announced

Karhade Brahmin Sangh Awards Announced

डॉ. शाम जेवळीकर

डॉ. शाम जेवळीकर हे प्रख्यात नेत्रशल्य विशारद असून १९८२ पासून २०१३ पर्यंत त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. राज्यपालांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट नेत्रशल्य विशारद म्हणून गौरवण्यात आले आहे. नेत्रदानासंबंधी त्यांनी समाजात जनजागृती केली असून सिंधुदुर्गामध्ये १२ केराटोप्लास्टि शस्त्रक्रिया केल्या आहेत. Karhade Brahmin Sangh Awards Announced

Karhade Brahmin Sangh Awards Announced

सदानंद ठाकुरदेसाई

सदानंद ठाकुरदेसाई गेल्या १५ वर्षांपासून शिक्षक असून सध्या मोरोशी शाळा क्र. १ मध्ये शिक्षक आहेत. २००७ पासून ते शिक्षक आहेत. सुरवातीला वाल्ये शाळा क्र. १ येथे त्यांनी ८ लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव करून शाळेचा चेहरामोहरा बदलला. ज्ञानदानासोबत त्यांनी रक्तदान, आरोग्य, पशुसंवर्धन शिबिरे, अभ्यासिका असे समाजोपयोगी उपक्रम राबवले. राजापूर तालुक्यातील नवोपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित आहेत. मोरोशी शाळेत त्यांनी मदतीतून डिजिटल वर्ग साकारला आहे. Karhade Brahmin Sangh Awards Announced

Karhade Brahmin Sangh Awards Announced

सुरेश सप्रे

सुरेश सप्रे यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर १९८७ साली दै. रत्नभूमीमधून पत्रकारितेला सुरवात केली. १९८८ पासून रत्नागिरी टाइम्सचे ते देवरुख प्रतिनिधी व २००३ पासून ते रत्नागिरी टाइम्सचे संगमेश्वर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. पत्रकारीतेबरोबरच तालुक्याच्या आणि विशेषतः देवरुखच्या प्रत्येक सांस्कृतिक, सामाजिक चळवळीत सहभाग घेतात. राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, आकार ऑर्गनायझेशनच्या स्थापनेत पुढाकार, खाद्य महोत्सव, नाट्य महोत्सव, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे भरवतात. संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपद भूषवले असून सध्या रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. Karhade Brahmin Sangh Awards Announced

Karhade Brahmin Sangh Awards Announced

महेश गर्दे

उद्योजक पुरस्कार महेश गर्दे यांनी सुरवातीला विहार उद्योग समूहात मॅनेजर म्हणून आणि २०१५ पासून लॉजिंग प्रोप्रायटरी तत्वावर चालवण्यास घेतले. अकाउंटिंग मॅनेजमेंटचा व्यवसाय करतात. ते जाणीव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेमार्फत ते रक्तदान शिबिरे व सामाजिक कार्य करत आहेत. रत्नागिरी आर्मी, पोलिस मित्र, जनजागृती संघ, जनशिक्षण संस्थानचे ते सदस्य आहेत. गेल्या वर्षापासून त्यांनी सिद्धाई फूडस नावाने फूड प्रोसेसिंग युनिट सुरू केले. कोकणातील पदार्थांना परदेशी बाजारपेठ देत आहेत. संकल्प कला मंच, यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार, रोटरी क्लब, जायंटस इंटरनॅशनल, महाराष्ट्र पत्रकार संघ आदींकडून त्यांना गौरवण्यात आले आहे. कोरोना कालावधीत त्यांनी कोरोना योद्धा म्हणून काम करताना रुग्ण व नातेवाइकांना आधार दिला. Karhade Brahmin Sangh Awards Announced

Karhade Brahmin Sangh Awards Announced

शिल्पा करकरे

शिल्पा करकरे यांनी मामाचा गाव या संकल्पनेतून तुरळ, संगमेश्वर येथे रस्टिक हॉलिडेजला सुरवात केली. पुण्या, मुंबईचे अनेक पर्यटक येथे येतात. यामुळे कोकणच्या पर्यटनाला चालना मिळाली आहे. ठाणे येथे 10 वर्षे हस्तकलेचे दुकान चालवल्यानंतर, शिल्पा व पती नितीन यांनी शहरी जीवनातील गजबज सोडून कोकणातील त्यांच्या वडिलोपार्जित घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 210 वर्षे जुने घर सुस्थितीत ठेवले व गावकऱ्यांना रोजगार मिळेल असा पर्यटन व्यवसाय सुरू केला. येथे स्थानिक लाकडी वस्तू बनवल्या जातात आणि स्थानिक खाद्यपदार्थ तयार करतात. Karhade Brahmin Sangh Awards Announced

Karhade Brahmin Sangh Awards Announced

सायली कर्लेकर

सायली कर्लेकर हिची रा. भा. शिर्के प्रशालेत इयत्ता आठवीत शिकताना राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. हिमाचल ऊना येथे झालेल्या खो-खो राष्ट्रीय स्पर्धेत तिने यश प्राप्त केले. तिने या खेळाची सुरवात इयत्ता पाचवीपासून केली. या खेळाचा सराव छत्रपती शिवाजी स्टेडियमवर नियमितपणे करते. शाळेचे क्रीडा शिक्षक विनोद मयेकर, राष्ट्रीय खो-खो पटू पंकज चवंडे हे तिचे मार्गदर्शक, प्रशिक्षक आहेत. गेल्या चार वर्षांपासून सायली कर्लेकर खो-खो हा खेळ शिकत आहेत. या कालावधीत तिने अनेक जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.  Karhade Brahmin Sangh Awards Announced

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKarhade Brahmin Sangh Awards AnnouncedLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.