• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे पुरस्कार २४ डिसेंबरला

by Guhagar News
December 15, 2023
in Ratnagiri
48 0
0
Karhade Brahmin Association Award
94
SHARES
269
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रमुख पाहुणे वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे गुरुजी यांचे व्याख्यान

रत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण येत्या २४ डिसेंबरला दुपारी ३ वाजता शेरे नाका येथे संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात थाटात करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाचा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार विजेते वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे गुरुजी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते सार्वकालीन ब्राह्मणाचा आचार आणि विचार या विषयावर व्याख्यान देणार आहेत. Karhade Brahmin Association Award

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने २०२३ सालचे पुरस्कार तीन महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. यामध्ये राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार निधी शरद भिडे हिला प्रदान केला जाणार आहे. तसेच उद्योजक पुरस्कार सौ. संपदा विवेक पुरोहित, उद्योगिनी पुरस्कार सौ. रश्मी विनोद प्रभुदेसाई, आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार अनिल भालचंद्र जायदे यांना देण्यात येणार आहे. आदर्श कीर्तनकार पुरस्कार ह. भ. प. कुमार विष्णू भाट्ये, आदर्श पौरोहित्य पुरस्कार वे. मू. विष्णू सखाराम करंबेळकर आणि दर्पण पुरस्कार गुहागरमधील पत्रकार मयुरेश मुकुंद पाटणकर यांना प्रदान केला जाणार आहे. तसेच धन्वंतरी पुरस्कार सावंतवाडी येथील डॉ. मुरलीधर पुरुषोत्तम प्रभुदेसाई यांना सन्मानपूर्वक दिला जाणार आहे. Karhade Brahmin Association Award

वेदमूर्ती मुरवणे गुरुजी यांनी पुण्यामध्ये वेदमूर्ती दिनकर फडके गुरुजी यांच्याकडे वेदाध्ययन केले. त्यानंतर नाशिक, कणकवली येथे अध्यापनही केले. त्यांचे ऋग्वेद दशग्रंथ व पद, क्रम, जटा, घनाचे संपूर्ण अध्ययन झाले आहे. त्यांचे वायंगणी (ता. मालवण, सिंधुदुर्ग) येथील गुरुकुल ३० वर्षे सुरू आहे. आतापर्यंत १३ विद्यार्थ्यांनी घनांत अध्ययन पूर्ण केले आहे. तसेच आता २५ विद्यार्थी अध्ययन करत आहेत. अशा महातपस्वी गुरुवर्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त ज्ञातीबांधव व रत्नागिरीकरांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये आणि सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे. Karhade Brahmin Association Award

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKarhade Brahmin Association AwardLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share38SendTweet24
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.