पंचप्राणप्रतिज्ञा आणि “मेरी माटी मेरा देश” अभियानाचे उद्घाटन
गुहागर, ता. 28 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात भारत सरकार आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिनानिमित्त पंचप्राणप्रतिज्ञा आणि “मेरी माटी मेरा देश” या अभियानाचा शुभारंभ सोहळा करण्यात आला. हा कार्यक्रम दिनांक २६ जुलै, २०२३ रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) वतीने महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. Kargil Victory Day Celebration in KDB College

यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.पद्मनाभ सरपोतदार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. आनंद कांबळे व प्रा.निळकंठभालेराव उपस्थित होते. प्रस्ताविकामध्ये प्रा.भालेराव यानी विद्यार्थांना “मेरी माटी मेरा देश” या अभियानातर्गत दोन टप्प्यात राबविण्यात येणा-या उपक्रमांची – प्रतिज्ञा (पंचप्राण), दि.९ ऑगस्ट रोजी दत्तक गावात ७५ झाडांचे वृक्षारोपण व त्यानंतर समारोपाच्या वेळी दि. ३० ऑगस्ट ग्रामपंचायतमधील माती दिल्ली येथे एकत्र करून अमृतवाटिका तयार केली जाणार असल्याची माहिती दिली. या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना आपण सीमारेषेवर जाऊन लढू शकत नाही. अशावेळी आपण त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून भारताला सुजलाम् सुफलाम् करण्याचे आवाहन केले. Kargil Victory Day Celebration in KDB College
ज्यांनी लिहली स्वातंत्र्याची गाथा
त्यांच्या चरणी ठेवू माथा ||
कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.आनंद कांबळे यांनी विद्यार्थांना-प्रतिज्ञा (पंचप्राण) दिली. अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य प्रा.पद्मनाभ सरपोतदार यांनी वेगवेगळ्या गावातून विविध वाड्यामधून येणा-या विद्यार्थ्यानी आपापल्या परिसरातील सैनिकांचे Database तयार करावेत, त्यांना कोणत्याही प्रकारची गरज असेल तर ती पूर्ण केली. तरच – प्रतिज्ञा (पंचप्राण) घेतल्याचा उद्देश सफल होईल असा आशावाद स्पष्ट केला.

यानंतर कारगिल युद्धावर आधारित “विरों को वंदन” राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कु. प्राजेश धावडे संकलित देशभक्तीपर चित्रफित दाखविण्यात आली. तसेच या अभियानांतर्गत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील ६० स्वयंसेवकांनी स्वयं स्फूर्तीने राष्ट्रीय अभियान योगदानासाठी ऑनलाईन नोंदणी केली. Kargil Victory Day Celebration in KDB College
यावेळी बहुसंख्येने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सभासद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.डॉ. रामेश्वर सोळंके यांनी केले. Kargil Victory Day Celebration in KDB College
