विजेता निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ तवसाळ तांबडवाडी तर जय हनुमान क्रिकेट संघ कर्दे वरचीवाडी उपविजेता
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील श्री गणेश उत्साही मंडळ कर्दे सनगरेवाडी गुहागर तालुका आयोजित प्रथमच मुंबईत नायगाव येथे सनगरेवाडी चषक 2025 पर्व पहिले क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी या स्पर्धेचे उद्घाटन सनगरेवाडीचे ग्रामस्थ श्री प्रकाश पाडदळे यांच्या हस्ते करण्यात आले. Karde Sangrewadi Cricket Tournament


या स्पर्धेत सनगरेवाडी चषक 2025 चे मानकरी निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ तवसाळ तांबडवाडी ठरला. तर जय हनुमान क्रिकेट संघ कर्दे वरची वाडी उपविजेता ठरला. मालिकावीर तवसाळ तांबडवाडी संघाचा नितेश पाडदळे, उत्कृष्ट गोलंदाज तवसाळ तांबडवाडी संघाचा स्वप्निल घाणेकर, उत्कृष्ट फलंदाज कर्दे वरची वाडी संघाचा स्वप्निल गावणंग ठरला. त्यांना चषक आणि टिशर्ट देवून गौरविण्यात आले. Karde Sangrewadi Cricket Tournament


या स्पर्धेला प्रमुख पाहुणे श्री मंगेश येद्रे, श्री निलेश कुळये, श्री भरत हुमणे, श्री राजेश येद्रे, श्री दिनेश येद्रे, नितीन जोशी असे मान्यवर उपस्थितांचे आभार मानले. स्पर्धेचे समालोचक कु.सागर सुर्वे यांना केले. तर या स्पर्धेचे facebook live Dj सचिन कुळये यांच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेला लाभलेलं देणगीदारांचे आभार मानण्यात आले. या स्पर्धेसाठी कर्दे गावाचे मानकरी व वाडी प्रमुख श्री. सुरेश पाडदळे, सल्लागार श्री प्रकाश पाडदळे, उपाध्यक्ष श्री कृष्णा सनगरे, अध्यक्ष कु.आनंद सनगरे, सचिव संतोष कुरटे, खजिनदार संजय बडबे, मंडळाचे सदस्य दिलीप पाडदळे, संतोष नाचरे, मंगेश पाडदळे, सुभाष सनगरे, महेश पाडदळे, सुशांत पाडदळे, सुरज पाडदळे, संतोष सनगरे, राजेश सनगरे, मंडळाचे सदस्य यांनी उत्तम नियोजन व सहकार्य केले होते. Karde Sangrewadi Cricket Tournament

