अधिवेशनात लक्षवेधीला सरकारकडून सकारात्मक उत्तर
गुहागर, ता. 23 : कोकणासाठी महत्त्वाचा असलेला, पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा चिपळूण ते कऱ्हाड रेल्वेमार्ग Karad-Chiplun railway line प्रकल्पासंदर्भातील बैठक येत्या महिन्याभरात घेण्यात येईल. अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी अधिवेशनात दिली. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार शेखर निकम, आमदार योगेश सागर, आमदार डॉ. देवराव होणी यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. चिपळूण कऱ्हाड रेल्वे मार्ग झाल्यास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जावून त्यांचा फायदा प्रवासी, पर्यटक, आरोग्य आणि व्यापार आदी अनेक क्षेत्रांना होणार आहे. Karad-Chiplun railway line

कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्ग Karad-Chiplun railway line राजकीय टोलवा-टोलवीमध्ये बारगळू नये. या प्रकल्पाचे भूमीपूजन तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू Suresh Prabhu यांनी केले होते. शासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असतानाच भूमिपूजन होत असते. तरीसुद्धा हा प्रकल्प कसा काय बारगळला? यामुळे कऱ्हाड ते चिपळूण रेल्वे प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद केली जावी व हा प्रकल्प तात्काळ मार्गी लागावा, अशी मागणी आज विधानसभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), आमदार शेखर निकम (MLA Shekhar Nikam), आमदार योगेश सागर, आमदार डॉ. देवराव होणी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. Karad-Chiplun railway line
चिपळूण- कऱ्हाड रेल्वेमार्ग Karad-Chiplun railway line प्रकल्पासंदर्भातील बैठक येत्या महिन्याभरात घेण्यात येईल, असे उत्तर मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात दिले आहे. भुसे म्हणाले की, कऱ्हाड – चिपळूण नवीन रेल्वे लाईन प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्र सरकारचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा निश्चित करण्यात आला असून ७ मार्च २०१२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी या प्रकल्पाची किंमत ९२८.१० कोटी रुपये होती, त्यानुसार राज्य शासनाची ५० टक्के हिश्श्याची रक्कम ४६४.०५ कोटी इतकी होती. केंद्राने त्यांच्या हिश्श्याची रक्कम पुढील तीन वर्षांत द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. या दरम्यान कोकण रेल्वे महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार या प्रकल्पाची सुधारीत अंदाजित रक्कम ३१९६ कोटी झाली. Karad-Chiplun railway line

रेल्वे मंत्रालयाने (Indian Railway) सहभाग धोरण २०१२ अंतर्गत चिपळूण- कऱ्हाड रेल्वेमार्गास Karad-Chiplun railway line संयुक्त उपक्रमाद्वारे राबविण्यास मंजुरी दिली. या उपक्रमात मेसर्स शापूरजी पालनजी (M/s Sapurji Palanji) यांची भागीदार म्हणून निवड करण्यात आली आणि भविष्यकालीन संयुक्त उपक्रम म्हणून कोकण रेल्वे आणि शापूरजी पालनजी यांच्यादरम्यान प्रत्येकी २६ टक्के आणि ७४ टक्के या प्रमाणात सहभाग निश्चितीचा करार करण्यात आला. दरम्यानच्या काळात या प्रकल्पामध्ये शापूरजी पालनजी कंपनी सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरच्या काळात केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी राज्य शासनाने या मार्गाची अंमलबजावणी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीमार्फत करावी आणि राज्य शासनाने ८० टक्के भार उचलावा, असे राज्य शासनास कळविले. Karad-Chiplun railway line
मात्र, राज्यासमोरील परिस्थिती पाहता समप्रमाणात केंद्र आणि राज्याने आर्थिक सहभाग उचलावा, अशी विनंती रेल्वे मंत्रालयाला करण्यात आली, यावर केंद्राकडून अद्याप काही कळविण्यात आलेले नसल्याचे भुसे यांनी सांगितले. महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीकडून (Maharashtra Rail Infrastructure and Development Corporation – MAHARAIL) कऱ्हाड – चिपळूण आणि वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सादरीकरण करण्यात आले. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वे प्रकल्पास मान्यता दिली असून त्याचा समावेश पिंकबुकमध्ये ड-चिपळूण रेल्वेमार्गासाठी पुन्हा करण्यात आला आहे. कऱ्हाड-1 केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही भुसे यांनी सांगितले. Karad-Chiplun railway line

याआधीच्या प्रस्तावात ‘कऱ्हाड-चिपळूण हा रेल्वे मार्ग १०३ कि.मी. लांबीचा असून, याचा प्रस्तावित खर्च ३१९५.६० कोटी रुपये होता. या मार्गावर कऱ्हाडपासून खोडशी, सुपने, विहे, मल्हार पेठ, नाडे, पाटण, येराड, कोयना रोड ही ठिकाणे येणार आहेत. पुढे सह्याद्री पर्वतरागांच्या बोगद्यांतून हा मार्ग खेर्डी (चिपळूण) येथे कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गाला हा मार्ग मिळणार आहे. या मार्गामुळे कोकण व घाटमाथा रेल्वेने जोडण्यास मदत होणार असून प्रवाशी, व्यापारी, उद्योग व्यावसायिकांना देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रवासासह मालवाहतूकीसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.’ Karad-Chiplun railway line
