• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

साईनाथ कांबळे यांना “ऊर्जाभूषण पुरस्कार 2023”

by Manoj Bavdhankar
June 10, 2023
in Ratnagiri
100 1
0
Kamble to receive “Urjabhushan Award 2023”
196
SHARES
560
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महावितरण कोकण परिमंडलाकडून मानपत्र प्रदान

गुहागर ता. 10 : चिपळूण वरीष्ठ. तंत्रज्ञ  शा.का. गुहागर, चिपळूण विभाग येथील श्री. साईनाथ कांबळे हे महावितरण कोकण परिमंडलाकडून देण्यात येणाऱ्या “ऊर्जाभूषण पुरस्कार 2023” चे मानकरी ठरले आहेत. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. Kamble to receive “Urjabhushan Award 2023”

Kamble to receive “Urjabhushan Award 2023”

साईनाथ कांबळे हे सन 2022-23 मध्ये वाहिनी कर्मचारी म्हणून त्यांनी ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान केली, वेळोवेळी रोहित्र आणि विद्युत वाहिन्यांची देखभाल-दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, ग्राहकांच्या तक्रारीचे वेळेत निराकरण करणे, वीजदेयकांची नियमित वसुली करणे याकरीता जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत आले. परिणामी महावितरणप्रती ग्राहकांची विश्वासार्हता वाढीस लागली आहे. महावितरण कंपनीच्या ध्येय-धोरणांची अंमलबजावणी करण्यात त्यांनी धडाडीने पुढाकार घेतला आहे. यामुळे ‘कोकण परिमंडळाचा’ राज्यात नावलौकीक वाढविण्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे. या गौरवास्पद कार्यामुळे ते “ऊर्जाभूषण पुरस्कार 2023” चे मानकरी ठरले आहेत. Kamble to receive “Urjabhushan Award 2023”

कोकण परिमंडल, मुख्य अभियंता, श्री. परेश रामचंद्र भागवत आपल्या गौरवास्पद कार्यामुळे आपण “ऊर्जाभूषण पुरस्कार 2023” चे मानकरी ठरला आहात. हे मानपत्र प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद व अभिमान आहे. आपल्याकडून आगामी काळात अशीच अत्युच्च कामगिरीची अपेक्षा आहे. आपल्या ग्राहकांना दर्जेदार वीजसेवा देऊन राज्य व देशाच्या शाश्वत विकासात योगदान देण्यासाठी महावितरण वचनबद्ध आहे. या वचनपूर्तीसाठी निष्ठापूर्वक, सचोटीने, कौशल्य व सातत्यपूर्ण परिश्रमातून योगदान देणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकुशल व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यासाठीच हा “ऊर्जाभूषण” पुरस्कार…! – श्री. परेश रामचंद्र भागवत, मुख्य अभियंता, कोकण परिमंडल. Kamble to receive “Urjabhushan Award 2023”

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKamble to receive “Urjabhushan Award 2023”Latest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarUrjabhushan Award 2023गुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share78SendTweet49
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.