• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत १ जुलैपासून कल्पवृक्ष सप्ताह 

by Mayuresh Patnakar
June 30, 2023
in Ratnagiri
55 1
0
रत्नागिरीत १ जुलैपासून कल्पवृक्ष सप्ताह 
109
SHARES
310
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 30 : कृषी दिनापासून रत्नागिरीत स्वराज्य ॲग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे कल्पवृक्ष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.‌ त्यामध्ये १ ते ७ जुलैपर्यंत नारळ पिकासंदर्भात मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. Kalpavriksha Week in Ratnagiri from 1st July

स्वराज्य ॲग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी २०१५ पासून नारळ झाडाचे व्यवस्थापन आणि मार्गदर्शन करत आहे. नारळ पाडपी न मिळणे, रुगोज चक्राकार पांढऱ्या माशीची लागण, गेंड्या भुंग्याचे आक्रमण यामुळे नारळ बागायतदार त्रस्त झाले आणि हतबल झाले आहेत. विविध समस्यांच्या व्यवस्थापनासाठी येणारा खर्च सुरुवातीला उत्पन्नापेक्षा जास्त होतो म्हणून अनेक जण कल्पवृक्ष समजल्या जाणाऱ्या नारळाच्या झाडाकडेच लक्षच देत नाहीत. Kalpavriksha Week in Ratnagiri from 1st July

नारळ झाडाच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नये, यासाठी आणि नारळाच्या झाडाच्या योग्य नियोजनासाठी स्वराज्य ॲग्रो कंपनीने १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत कल्पवृक्ष सप्ताहाच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. या सप्ताहात दररोज सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत २०३, श्रम साफल्य, मनीषा टायपिंग सेंटरच्या वर, दुसरा मजला, खालची आळी, रत्नागिरी येथे शिबिर होईल. Kalpavriksha Week in Ratnagiri from 1st July

नारळ झाड मालकांनी या कल्पवृक्ष सप्ताहात सामील व्हावे.  शिबिराला येताना मोबाइलमध्ये नारळाच्या झाडांचे झावळीजवळचे आणि बुंध्याजवळचे फोटो काढून आणावे, असे आवाहन कंपनीने केले आहे.  अधिक माहितीसाठी 9607 192 912 किंवा 8080 188 218 या क्रमांकांवर संपर्क साधावा. Kalpavriksha Week in Ratnagiri from 1st July

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKalpavriksha Week in Ratnagiri from 1st JulyLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarकल्पवृक्षगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share44SendTweet27
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.