गुहागर, ता. 19 : मढाळ येथील प्रगतीशिल शेतकरी रविंद्र कारकर यांच्या कलिंगड विक्री केंद्राचे उद्घाटन सरपंच सौ.अंकिता चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. यावेळी तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर, पं.स.गुहागरचे कृषी अधिकारी आर.के.धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, शेतकरी रविंद्र कारकर, श्रद्धा कारकर, ग्राम पंचायत सदस्य वैष्णवी मोरे, शेजल सोलकर, ग्रामपंचायत सदस्य अनंत लांजेकर, सीआरपी साक्षी चव्हाण, प्रमिला कारकर, वैशाली कारकर, राजेंद्र कारकर, गणपत कारकर, शुभांगी कारकर, महेंद्र कारकर, मानसी सोलकर, वंदना कारकर, बचत गटाच्या सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. Kalingad Sales Center at Madhal Pali