• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

काजुर्ली  मानवाडीत दप्तराविना शाळा उपक्रम

by Mayuresh Patnakar
August 8, 2023
in Guhagar
103 1
0
Kajurli Manwadi School Without Daptar
203
SHARES
580
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम , आबलोली
गुहागर ता. 08 : जिल्हा परिषद शाळा काजुर्ली नं.२   मानवाडी शाळेत शनिवार दिनांक ०५/०८/२०२३ दप्तराविना शाळा  हा उपक्रम राबविण्यात आला.  या उपक्रमांतर्गत साने गुरुजी कथामाला या कार्यक्रमाचे दुसरे पुष्प गोवण्यात आले. हा संपूर्ण कार्यक्रम कु.रूतुजा तावडे या विद्यार्थीनीच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. Kajurli Manwadi School Without Daptar

या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन, नियोजन इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी केले असून कार्यक्रमाची सुरुवात सानेगुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर या कार्यक्रमात कु. मेघना रमेश कुवारे, सिद्धेश सुधीर रेवाळे यांनी कथा सादर केल्या. कु. सोहम संजय रेवाळे आणि राज उदय जाधव या विद्यार्थ्यांनी विनोद सांगून मिमिक्री केली. तसेच कु. स्मिता दिपेंद्र हुमणे या विद्यार्थ्यीनीने उत्तम प्रकारे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून नाट्यही सादर केले. Kajurli Manwadi School Without Daptar

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री दशरथ रघुनाथ साळवी यांनी सानेगुरुजी यांची प्रार्थना आणि शामची आई या चित्रपटातील भरजरीचा पितांबर हे गीत सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना श्री.  सौ. श्रावणी अनिकेत पागडे, सौ. आम्रपाली मोहिते यांनी विद्यार्थांकडून अत्यंत जबाबदारीने पार पाडली. या उपक्रमामुळे मुलांमध्ये संवेदनशीलता, सहकार्य वृत्ती, समयसूचकता, संभाषण व सभाधीटपणा, या गुणांची जोपासना वाढीस लागते. या कार्यक्रमावेळी इयत्ता ७वी मधील  विद्यार्थीनी कु. श्रावणी दिलीप हुमणे हिचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यानी खूप मेहनत घेतली. Kajurli Manwadi School Without Daptar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKajurli Manwadi School Without DaptarLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share81SendTweet51
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.