संत गाडगेबाबा परिट समाज संस्था रत्नागिरी जिल्हा ; सचिव – रुपेश चाळके
गुहागर, ता. 27 : संत गाडगेबाबा परिट समाज संस्था रत्नागिरी जिल्हा युवक अध्यक्षपदी सुयोग सुभाष कदम तर सचिवपदी रुपेश राजाराम चाळके यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड संस्थेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांनी कार्यकारिणी सभेमध्ये जाहीर केली. Kadam as President of Parit Samaj Sanstha

नवनिर्वाचित कार्यकारिणीत अध्यक्ष सुयोग कदम, उपाध्यक्ष संदेश चव्हाण, ज्ञानेश भोसले, सचिवपदी रुपेश चाळके, सह सचिव संकेत सु. कदम, खजिनदार प्रथमेश कदम , सहखजिनदार निरज दुर्गावले, संघटक रितेश कदम, सदस्यपदी तेजस कदम, शुभम कदम, निलेश कदम, ओंकार दुर्गावले, आकाश पिंपळकर, ऋतुराज कदम, अजिंक्य रोकडे, अरुण कडा, मकरंद उचाटकर यांची निवड करण्यात आली आहे. Kadam as President of Parit Samaj Sanstha

नवीन युवा कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष कदम, राज्य सल्लागार हसमुखभाई पांगारकर, उपाध्यक्ष वसंत पिंपळकर, जगदीश कदम, जिल्हा सचिव स्वप्निल शिंदे व सहसचिव रितेश महाडिक, खजिनदार राजू भोसले, सहखजिनदार दर्गेश्वर रोकडे, लॉन्ड्री संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा प्रिया शिंदे, सल्लागार आबा महाडिक, संतोष कदम, दशरथ पावसकर, वैशाली शिंदे, सुयोग घाग, संतोष शिंदे, शैलेश दुर्गावले, अरुण नाकती, विजयराव कदम, सुरेश कदम आदींनी उपस्थित राहून अभिनंदन केले. Kadam as President of Parit Samaj Sanstha
