गुहागर, ता. 05 : सेव्हन स्टार क्रीडा मंडळ गुहागर आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सिद्धेश्वर प्रतिष्ठान वेलदुर संघाने सेव्हन स्टार संघावर ६ गुणांनी मात करत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत १६ संघानी सहभाग घेतला होता. Kabaddi Tournament of Seven Star Sports Board
स्पर्धेची पहिली उपांत्य फेरीची लढत सिद्धेश्वर प्रतिष्ठान वेलदुर व फ्रेंड सर्कल गुहागर खालचा पाट यांच्यामध्ये होऊन एकतर्फी झालेल्या सामन्यात सिद्धेश्वर प्रतिष्ठान संघाने २० गुणांनी विजय संपादन केला. दुसरी उपांत्य फेरीची लढत यजमान सेव्हन स्टार गुहागर विरुद्ध पिंपळादेवी वरचा पाट मध्ये होऊन यामध्ये सेव्हन स्टार संघाने१८ गुणांनी विजयी झाला. स्पर्धेची अंतिम फेरीची लढत यजमान सेव्हन स्टार गुहागर विरुद्ध सिद्धेश्वर प्रतिष्ठान वेलदुर यांच्यामध्ये होऊन सिद्धेश्वर प्रतिष्ठान वेलतूर संघाने ६ गुणांनी विजयी मिळवत स्पर्धेचे अजिंक्य पटकावले. Kabaddi Tournament of Seven Star Sports Board


प्रथम क्रमांक प्राप्त सिद्धेश्वर प्रतिष्ठान वेलदूर संघाला ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषक, तर द्वितीय क्रमांक ७ हजार ७७७ रुपये व आकर्षक चषक देऊन मान्यवर जास्त गौरवण्यात आले. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू तेजस धामणस्कर( सिद्धेश्वर प्रतिष्ठान वेलदुर) एलईडी टीव्ही व सन्मान चिन्ह, उत्कृष्ट चढाईकार सौरभ भागडे (सेवन स्टार गुहागर) टॉवर फॅन व सन्मान चिन्ह, उत्कृष्ट पकड शुभम भोसले (सिद्धेश्वर प्रतिष्ठान वेलदुर) टॉवर फॅन व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. Kabaddi Tournament of Seven Star Sports Board


स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला संतोष वरंडे, संतोष गोयथळे, शामकांत खातू, संदीप बारटक्के, सेव्हन स्टार चे अध्यक्ष किशोर तांबट, उपाध्यक्ष सिद्धिविनायक जाधव, खजिनदार शशिकांत शिंदे, माजी अध्यक्ष सदानंद मुसळे, माजी खजिनदार दिनेश भोसले, मोहन चव्हाण, सर्वेश भावे, नंदकुमार पाटील उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन दीपक देवकर व साईराज दाभोळकर यांनी केले. Kabaddi Tournament of Seven Star Sports Board