गुहागर, ता. 17 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने शिवजयंती निमित्त उद्या दिनांक १८ व १९ रोजी गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तालुकास्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Kabaddi Tournament in Guhagar
या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रुपये १५ हजार व चषक, उपविजेत्या संघाला ११ हजार व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट चढाईकार, उत्कृष्ट पकड, टर्निग पॉईंट, बोनस किंग, उगवता तारा, प्लेअर ऑफ द डे अशी निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा लाभ सर्व क्रीडा रसिकांनी घ्यावा, असे आवाहन फ्रेंड सर्कल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. Kabaddi Tournament in Guhagar