गुहागर, ता. 13 : श्रीराम दत्त सेवा मंडळ आरे आयोजित गुहागर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत साई श्रद्धा बाग संघाने सेव्हन स्टार गुहागर संघावर मात करत सलग दुसरे विजेतेपद पटकावले. सदर स्पर्धेत एकूण १८ संघानी सहभाग घेतला होता. Kabaddi tournament concludes in Aare
स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी ही साई श्रद्धा बाग विरुद्ध सिद्धेश्वर वेलदूर या दोन संघांमध्ये झाली. त्यामध्ये साई श्रद्धा बाग संघ विजयी ठरला. तर दुसरी उपांत्य फेरीची लढत यजमान श्रीराम दत्त सेवा आरे विरुद्ध सेव्हन स्टार गुहागर यांच्यामध्ये झाली. यामध्ये सेव्हन स्टार संघ विजयी झाला. स्पर्धेची अंतिम फेरीची लढत सेव्हन स्टार गुहागर विरुद्ध साई श्रद्धा बाग संघामध्ये झाली. अंतिम फेरीची लढत अटीतटीची होऊन त्यामध्ये सेव्हन स्टार गुहागर संघावर एका गुणांनी मात करत साई श्रद्धा बाग संघाने सलग दुसरे विजेतेपद पटकावले. Kabaddi tournament concludes in Aare


विजेत्या साई श्रद्धा बाग संघाला ११ हजार ०१ रुपये व आकर्षक चषक, उपविजेत्या सेव्हन स्टार गुहागर संघाला ७ हजार ०१ रुपये व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई राज भोसले ( सेव्हन स्टार) चषक, उत्कृष्ट पकड वृषभ बागकर (साई श्रद्धा बाग) चषक, सर्वोत्कृष्ट खेळाडू सौरभ बागकर (साई श्रद्धा ) चषक, अंतिम सामना टर्निंग पॉईंट वृषभ बागकर ( साई श्रद्धा) टी-शर्ट, बोनस किंग सौरभ भागडे स्पोर्ट शूज, प्लेयर ऑफ द डे सौरभ बागकर ( साई श्रद्धा) मनगटी घड्याळ, स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ जय हनुमान चिखली यांना मान्यवरांच्या हस्ते चषक गौरविण्यात आले. Kabaddi tournament concludes in Aare
यावेळी आरे ग्रामपंचायत सरपंच समित घाणेकर, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, सुरेश सावंत, दशरथ भोसले, प्रमोद भोसले, संदीप देवकर, साईनाथ कळझुणकर, अरुण भोसले, नवनाथ भोसले, जयप्रकाश बोले, हेमंत शेटे, प्रदीप शेटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन दिपक देवकर यांनी केले. Kabaddi tournament concludes in Aare