भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या वाढदिवस व ग्रामदेवता पालख्यांचे सहाणेवर आगमनानिमित्त आयोजन
गुहागर, ता. 27 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य, तवसाळ गावचे सुपुत्र मा. श्री निलेशजी सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि कोतळूक ग्रामदेवता पालख्यांचे सहाणेवर आगमन याचे औचित्य साधून तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने ग्रामदेवता सहाणेसमोर आज गुरूवार दि. 27 व बुधवार 28 मार्च 2025 या दोन दिवस सायंकाळी ६ वा. पासून सुरु करण्यात येणार आहेत. Kabaddi tournament at Kotluk today


गुहागर तालुका कबड्डी असोसिएशन मान्यतेने संलग्न असलेल्या ८ संघांमध्ये साखळी पद्धतीने या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख रक्कम 10 हजार 1 व चषक, द्वितीय क्रमांकास रोख रक्कम 5 हजार 1 व चषक, तृतीय व चतुर्थ विजेत्या संघांना चषक देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, पकड अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेदरम्यान भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचा वाढदिवस 27 मार्च रोजी रात्री 10 वा. साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व क्रिडा प्रेमी हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी वतीने करण्यात आले आहे. Kabaddi tournament at Kotluk today