श्री राम दत्त सेवा आरे विजेता तर फ्रेंड सर्कल उपविजेता
गुहागर, ता. 23 : फ्रेंड सर्कल कला क्रिडा सांस्कृतिक व सामाजिक मंडळ गुहागर खालचापाटच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती निमित्ताने गुहागर तालुकास्तरीय मॅट वरील कबड्डी स्पर्धेच आयोजन श्री वराती देवीच्या पवित्र भूमी मध्ये करण्यात आले होते. अंतिम सामन्यात राज भोसलेच्या आक्रमक चढाईच्या जोरावर श्री राम दत्त सेवा आरे संघाने फ्रेंड सर्कल संघावर मात करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत १८ संघांनी सहभाग घेतला होता. Kabaddi Tournament at Khalchapat
या स्पर्धेच्या स्व.विष्णूपंत पवार क्रीडानगरीच उद्घाटन गुहागर तालुका माजी आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे बक्षिस वितरण वेळणेश्वरचे माजी सरपंच नवनीत ठाकुर, सतिश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फ्रेंड सर्कल मंडळाचे आधारस्तंभ माजी नगराध्यक्ष श्री. जयदेव मोरे, मंडळाचे अध्यक्ष श्री. सागर मोरे, उपाध्यक्ष श्री. अनिकेत भोसले, कायदेशीर सल्लागार अँड. मयुरेश पावसकर, सचिव. श्री. रोहन विखारे, खजिनदार श्री. अनराज वराडकर, संस्थापक अध्यक्ष श्री. सुहास सुर्वे, गावचे खोत श्री. अमोल वराडकर, श्री. महेंद्र वराडकर, माजी ग्रामपंचायत उपसरपंच श्री . रजनीनाथ वराडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रशांत मोरे, जेष्ठ नागरिक व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. Kabaddi Tournament at Khalchapat
पहिल्या सेमीफायनल मध्ये फ्रेंड सर्कल आणि तृप्ती नगर सामना सुमित आरेकरच्या कामगिरीच्या जोरावर बरोबरीत सुटला त्या नंतर ५-५ चढाई मध्ये केतन पावसकर च्या सुपर रेडच्या जोरावर यजमान फ्रेंड सर्कल संघाने गुहागर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला दुसऱ्या सेमी फायनल मध्ये श्री राम दत्त सेवा आरे संघाने एक तर्फी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धा यू ट्यूब लाईव्ह करण्यात आली होती. मैदानावर बहुसंख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते. Kabaddi Tournament at Khalchapat
स्पर्धेतील मालिकावीर – राज भोसले (कुलर फँन), अंतिम सामन्यातील सामनावीर – राज भोसले ( हेडफोन आणि स्किपिंग) स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईकार – सुमित आरेकर (ब्लूथूत स्पीकर) स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पकडपटू – अनिकेत भोसले ( स्मार्ट वाँच) स्पर्धेतील टर्निंग पॉइंट – सार्थक भोसले ( पाँवर बँक) स्पर्धेतील बोनस किंग – राज भोसले (मँट शूज) स्पर्धेतील उगवता तारा – प्रणित डेरे ( स्पोर्ट्स हुडी) पहिल्या दिवसाचा सर्वोत्तम खेळाडू – आयुष भोसले, दुसऱ्या दिवशीचा सर्वोत्तम खेळाडू – स्वराज देवकर (स्पोर्ट्स अप्पर) देऊन गौरविण्यात आले. Kabaddi Tournament at Khalchapat
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष श्री. सागर मोरे यांनी आभार मानले तसेच मनोगत व्यक्त करताना फ्रेंड सर्कल क्रिडा मंडळ कायम अबाधित राहील अशी ग्वाही दिली. स्पर्धेत पंच म्हणून खास दापोलीतून दादू सुर्वे, श्रीकांत तोडणकर, तुषार पाटील यांनी तर गुहागरचे समित घाणेकर, निलेश खेडेकर, समिर जांगळी, स्नेहल ओक यांनी काम पाहिले. स्पर्धेच समालोचन सुयोग आरेकर, दिपक देवकर, विक्रांत आरेकर, राज विखारे यांनी केले. Kabaddi Tournament at Khalchapat