• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्यस्तरीय कबड्डी पंच परीक्षेत स्नेहल व निलेश यांचे यश

by Ganesh Dhanawade
March 28, 2023
in Guhagar
190 2
0
Kabaddi Panch Exam Result Declared
373
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

खेड परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थी पंच स्वप्निल बैकर राज्यात प्रथम

गुहागर, ता. 28 : शहरातील स्नेहल ओक व अडूर गावातील निलेश खेडेकर हे राज्यस्तरीय कबड्डी पंच परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या माध्यमातून दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी राज्यस्तरीय पंच परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. Kabaddi Panch Exam Result Declared

सदर राज्यस्तरीय पंच परीक्षेत खेड केंद्रातील एकूण २९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पंच परीक्षेसाठी एकूण चार केंद्र होते. यामध्ये खेड, दापोली, संगमेश्वर व रत्नागिरी अशा चार परीक्षा केंद्राचा समावेश होता. त्यामध्ये खेड परीक्षा केंद्राने राज्यात सर्वाधिक बाजी मारली आहे. Kabaddi Panch Exam Result Declared

यामध्ये गुहागर शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक चैताली मेडिकलचे मालक अरुण ओक यांची स्नुषा सौ. स्नेहल निखिल ओक तसेच अडूर गावातील श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळाचे सदस्य निलेश महादेव खेडेकर यांनी या परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. याआधी राज्यस्तरीय कबड्डी पंच परीक्षेत गुहागर तालुक्यातून समीर जांगळी, समित घाणेकर यांनी यश मिळविले होते.आता स्नेहल ओक व निलेश खेडेकर यांना यश प्राप्त झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा व गुहागर तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या कडून अभिनंदन करण्यात येत आहे. Kabaddi Panch Exam Result Declared

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKabaddi Panch Exam Result DeclaredLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share149SendTweet93
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.