विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या उच्च शिखरावर न्यायचे असेल तर जि.प.च्या शाळा वाचवूया – संतोष कांबळे
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 15 : अतिशय दुर्गम, डोंगराळ व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ही त्यांचे मार्गदर्शक शिक्षक व आई- वडील यांच्या अथक परिश्रमाने होते आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची परिश्रम आणि जिद्द पाहून मलाही आश्चर्य वाटते. कोणत्याही सुख, सोयी सुविधा नसतानाही ही मुले प्रचंड मेहनत घेतात आणि आपली गुणवत्ता स्पर्धा परिक्षेत सिद्ध करतात आणि अमेरिकेतील इस्त्रो – नासामध्ये आपले, आपल्या शाळेचे, तालुका व जिल्ह्याचे नाव कोरतात यांचा मला सार्थ अभिमान वाटतो. विद्यार्थी मित्रांना घडवणारे शिक्षक आणि पालक कितीतरी पटीने महान आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या उच्च शिखरावर न्यायचे असेल तर जिल्हा परिषदेच्या शाळा आपण वाचवूया. असे जाहीर आवाहन कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य या शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक श्री.संतोष कांबळे यांनी केले. Joint Jubilee Festival at Khodde
कास्ट्राईब कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष व शिक्षक पतपेढीचे संचालक श्री.संतोष कांबळे सर यांचे अध्यक्षतेखाली खोडदे गोणबरेवाडी येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे महापुरुष व राष्ट्रमातांचा संयुक्त जयंती महोत्सव व गुणवंत विद्यार्थी, आदर्श शाळा व शिक्षकवृंद यांचा भव्य सत्कार सोहळा नुकताच मान्यवरांचे उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुष व राष्ट्रमाता यांच्या प्रतिमेचे पूजन दिपप्रज्वलीत करुन प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना संचालक श्री.संतोष कांबळे सर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले तर विश्वरत्न, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय देताना कुणाचीही गय केली नाही.
महाराजांची सामाजिक समता काय होती ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत उतरवीली. संतांची विचारधारा महाराजांनी घेतली तर महाराजांची विचारधारा महात्मा फुले यांनी घेतली. महात्मा फुले यांची विचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतली आणि ही विचारधारा संविधानात, घटनेत उतरवली किती महान विचार होते या राष्ट्रपुरुषांचे, महामानवांचे आणि राष्ट्रमातांचे हे विचार आपण अंगिकारुया असे आवाहन श्री.संतोष कांबळे सर यांनी केले व गुहागर तालुक्यातील कास्टाईब शिक्षक संघटनेचे शैक्षणिक आणि सामाजिक काम तालुका अध्यक्ष श्री.सुहास गायकवाड, सचिव श्री.वैभवकुमार पवार यांच्या माध्यमातून कार्यकर्ते योग्य दिशेने करीत आहेत अशी शाबासकीची थाप ही श्री.संतोष कांबळे सर यांनी दिली. Joint Jubilee Festival at Khodde
यावेळी कास्ट्राईबचे गुहागर तालुकाध्यक्ष श्री.सुहास गायकवाड, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे व्हाईस चेअरमन श्री.अरविंद पालकर, कुमार समर खेराडे, आरुष निवाते, सोहम बावधनकर, पुर्वा उमेश जाधव, श्री.दशरथ साळवी, श्री.संतोष शिरकर, दिनेश जाक्कर, श्री.बावधनकर, श्री.अमोल धुमाळ, श्री.जोगळेकर सर, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा सचिव श्री.संतोष मोहिते यांनी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी विचारपिठावर श्री.सुहास गायकवाड, श्री.संतोष कांबळे सर, श्री.संतोष मोहिते, वैभव पवार, संजय तांबे, अजय कांबळे, जोगळेकर सर, दशरथ साळवी, महेंद्र रेडेकर, नंदकुमार पवार, विश्वास खर्डे, अनंत साठे, चंद्रकांत हळ्ये, व्ही.टी.पाटिल, शाम पवार, बाबासाहेब राशिनकर, व्हनमाने सर, प्रदीप जाधव, प्रफूल्ल गायकवाड, अमोल होवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव श्री.वैभव पवार यांनी केले. Joint Jubilee Festival at Khodde