संदेश कदम, आबलोली
रत्नागिरी, ता. 08 : बौध्द समाज सेवा संघ, शाखा क्र.१ ग्रामिण, बौध्द विकास मंडळ- विभाग मुंबई, उत्कर्ष महिला मंडळ आणि यंग सिध्दार्थ मित्र मंडळ पालवणी यांच्या संयुक्त विद्यमाने जेतवन बुध्द विहार, पालवणी, तालुका मंडणगड येथे तथागत भगवान गौतम बुध्द यांची २५६८ वी जयंती तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती अशा संयुक्त जयंती महोत्सवाचे सोमवार दिनांक १३ आणि मंगळवार १४ मे २०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहे. joint birth anniversary of great men
सोमवारी १३ मे रोजी काशिनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली धम्म ध्वजारोहण होणार असून तथागत गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक व भन्ते आयुपाल यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यावेळी विविध क्रीडा स्पर्धा त्यानंतर शैक्षणिक, सेवा निवृत्त, देणगीदार यांचा बक्षीस आणि सत्कार समारंभ होवून शेवटी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. या संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण पवार आणि मनोहर पवार हे करणार आहेत. joint birth anniversary of great men
दुसऱ्या दिवशी १४ मे २०२४ रोजी सतिष पवार यांच्या अध्यक्षतेखाली धम्म वंदना घेण्यात येईल. यावेळी बौध्दचार्य अशोक पवार यांचे धार्मिक प्रवचन होईल. त्यानंतर नियोजित विविध कार्यक्रम होतील. सायंकाळी जाहीर सभेचे अयोजन करण्यात आले असून स्नेह भोजन होणार आहे. शेवटी कव्वाली हा प्रबोधनाचा कार्यक्रम होऊन या दोन दिवशीय जयंती महोत्सवाची सांगता होणार आहे. तरी आंबेडकरी जनतेने या जयंती महोत्सवाला वेळेत उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन प्रकाश पवार यांनी केले आहे. joint birth anniversary of great men