महायुती सरकारचा जर्मनीतील बाडेन वूटेनबर्ग या राज्याशी ऐतिहासिक करार
Guhagar News Speical Report : Jobs in Germany
राज्यातील तरुण-तरुणींना (Jobs in Germany) जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता महायुती सरकारने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात जर्मनीतील बाडेन वूटेनबर्ग या राज्याशी ऐतिहासिक सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे १० हजार तरुण/तरुणींना जर्मनीत रोजगाराची संधी मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील कुशल-अकुशल बेरोजगारांना जर्मन भाषेचे मोफत प्रशिक्षण आपल्याचं जिल्ह्यात देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण मोफत असणार असून यासाठी 76 कोटी रुपयांची तरतुद सरकारने केली आहे. यामुळे राज्यातील तरुणांना विदेशात नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. Jobs in Germany
Jobs in Germany
1. आरोग्यविषयक सुविधा विभाग Healthcare
रुग्णालयांसाठी परिचारिका, वैद्यकीय सहाय्यक ( Nurse (Hospital)/ Medical assistants (MFA), प्रयोगशाळा सहाय्यक (Lab assistant), रेडिओलॉजी सहाय्यक (Radiology assistant), दंत सहाय्यक, आजारी ज्येष्ठ नागरिकांसाठी काळजी घेणारे, फिजिओथेरपिस्ट, दस्तऐवजीकरण आणि कोडिंग/तृतीय पक्ष प्रशासन (Documentation and coding/Third party administration), लेखा आणि प्रशासन (Accounting and Administration), Sales Assistants, Ware House Assistants,
2. हॉस्पिटॅलिटी विभाग Hospitality
हॉटेल उद्योगात सर्व्हर, वेटर, रिसेप्शनिस्ट, कुक, हॉटेल मॅनेजर, अकाउंटंट, हाऊसकीपर्स, क्लीनर, कार्यालये, बस स्टँड, विमानतळ इ. सारख्या सार्वजनिक सेवा केंद्रांवर हाऊसकीपिंगसाठी.
3. व्यवसाय – कारागीर Craftsmen
विटा टाईल्स बसविणारे, प्लंबर (Plumbers), हलक्या आणि जड वाहनांच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिक Mechanics for vehicle repairs (light and heavy Vehicle), सुतार (Carpenters), पेंटर (Painters), हीटिंग तंत्रज्ञ (Heating technicians), इलेक्ट्रीशियन (Electricians), नूतनीकरणक्षम उर्जेमध्ये विशेष असलेले इलेक्ट्रीशियन (Electricians specialized in renewable energies),
4. अन्य व्यावसायिक विभाग
सुरक्षा, पोस्टल डिलिव्हरी, विमानतळावरील सपोर्ट स्टाफ (क्लीनर्स, बॅगेज हँडलर्ससाठी), Ware-house assistance, Sales assistants, Housekeeping, पॅकर आणि मूव्हर्स (Packers and movers), Delivery (postal service), Security, Drivers (bus / tram / train / truck, Jobs in Germany
प्रशिक्षण
10 वी पास, 12 वी पास, वर नमुद केलेल्या क्षेत्रातील कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण केलेले, पदवीधर उमेदवार देखील अर्ज करण्यासाठी पात्र आहेत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये आवश्यक असणारे सर्व ट्रेनिंग देखील तुम्हाला शासनाद्वारे दिले जाणारे.
जर्मन भाषा प्रशिक्षण उपक्रम
जर्मन भाषेत संवाद साधता यावा म्हणून जर्मन भाषेचे प्रशिक्षण मोफत देण्याचा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने हाती घेतला आहे. मुंबईमध्ये 15 केंद्रांवर असे प्रशिक्षण मिळणार असल्याची माहिती, मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्राचार्य मनीषा पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. Jobs in Germany
जर्मन भाषेची 15 केंद्र
प्रादेशिक विद्या प्राधिकरण अंतर्गत मुंबई जिल्ह्यातील पुढील 15 केंद्रांवर जर्मन भाषा प्रशिक्षण दिले जाणार आहे. श्रीराम वेल्फेअर सोसायटी हायस्कूल, अंधेरी पश्चिम; आई.इ.एस. न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे पूर्व; पार्ले टिळक विद्यालय, विलेपार्ले पूर्व; वेसावा विद्यामंदिर, अंधेरी पूर्व; शेठ चुनीलाल दामोदरदास बर्फीवाला हायस्कूल, अंधेरी पश्चिम; सेंट कोलंबा स्कूल, ग्रँड रोड; डी.एस. हायस्कूल, सायन पश्चिम; वालीराम बेहरूमल मेलवाणी मॉडेल हायस्कूल, ग्रँड रोड पश्चिम; अहिल्या विद्यामंदिर, काळाचौकी; एस.एस.एम.एम.सी.एम. गर्ल्स हायस्कूल, काळाचौकी; ओ.एल.पी.एस. हायस्कूल, चेंबूर; वाणी विद्यालय हायस्कूल, मुलुंड पश्चिम; पंत वालावलकर माध्यमिक विद्यालय, कुर्ला पूर्व; शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळा, घाटकोपर पूर्व आणि संदेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विक्रोळी पूर्व. Jobs in Germany
जर्मन भाषा शिकण्यासाठी 25 विद्यार्थ्यांचा एक प्रशिक्षण वर्ग याप्रमाणे 10,000 विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी 400 प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता आहे संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे २०० वर्ग घेतले जाणार आहेत. या वर्गात जर्मन भाषेचे ए १, ए २, बी १, आणि बी २ हे चार स्तर प्रशिक्षणार्थीना शिकविण्यात येणार आहेत. यासाठी महायुती सरकारने सुमारे ३६ कोटी गुंतवूण केली आहे. या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या शुल्काची जबाबदारी महाराष्ट्र शासन उचलणार असून महाराष्ट्राच्या अभ्यासाच्या कुठल्याही टप्प्यावर उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत.
शासनाकडून मिळणार पासपोर्ट
ज्या कुशल युवक/ युवतींची जर्मनीत जाण्यासाठी निवड होणार आहे त्यांना महाराष्ट्र शासनाकडून पासपोर्ट आणि विजा उपलब्ध करून देण्यात आहे येणार आहे. (Passport and Visa will be made available by the Government of Maharashtra.) Employment in Germany
जर्मनी भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
जर्मन भाषेचं संपूर्ण ज्ञान घेतल्यानंतर उमेदवारांना जर्मनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी लाभणार आहे. अर्ज करत असताना स्वतःचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, तसेच नंबर, ईमेल आयडी तसेच सध्याचा कायमस्वरूपी पत्ता यासारखी सविस्तर माहिती भरायची आहे जर्मन भाषेच्या या कोर्ससाठी तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे. अर्ज सादर करीत असताना विशिष्ट कौशल्यावर आधारित कामाच्या अनुभवाविषयी स्वतंत्र माहिती अर्जामध्ये नमूद करावी. नमूद करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. जर्मन भाषेसंदर्भात फेरफाराचं शुल्क अर्जदारांना द्यावं लागणार आहे त्यामुळे अर्जदारांनी गांभीर्यपूर्वक अर्ज करायचा आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज करायचा आहे. Jobs in Germany
या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी व भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.(https://maa.ac.in/GermanyEmployment/student-germany-employement.php)