शृंगारतळी नवरात्री उत्सव मंडळातर्फे 2 स्पर्धा
गुहागर, ता. 23 : श्री. निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळ, शृंगारतळी येथे सोमवार दि. 26 सप्टेंबर ते मंगळवार दि. 5 ऑक्टोबर 22 पर्यंत नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. या नवरात्री उत्सवात महिलांसाठी खास लकी ड्रॉ व्दारे दररोज 1 पैठणी जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. तसेच नवरात्रौ उत्सवात रेकॉर्ड डान्स स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन यांचे नियोजन मंडळाने केले आहे. Jinka Paithani in Navratri festival

श्री.निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळ, शृंगारतळी व कै. सुशिल वेल्हाळ यांच्यावतीने सोमवार दि. 26 सप्टेंबर ते मंगळवार दि. 5 ऑक्टोबर 22 पर्यंत नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त रेकॉर्ड डान्स स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन व दररोज रात्री दांडीया रास कार्यक्रम होणार आहेत. महिलांसाठी खास आकर्षण म्हणजे श्री गणेश कृपा ज्वेलर्सचे जय गुहागरकर यांच्या सौजन्याने लकी ड्रॉ व्दारे दररोज 1 पैठणी जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. Jinka Paithani in Navratri festival

तरी या कार्यक्रमाला आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून शोभा वाढवावी व आनंद व्दिगुणित करावा, अशी नम्र विनंती श्री. निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोज कोळवणकर, उपाध्यक्ष जय गुहागरकर, उत्सव समिती अध्यक्ष प्रसाद कुष्टे, उत्सव समिती उपाध्यक्ष नामदेव नर्बेकर व सदस्य गौरव वेल्हाळ यांनी केली आहे. Jinka Paithani in Navratri festival
