रत्नागिरी, ता. 15 : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे शहरातील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात मोठ्या उत्साहात आणि ज्ञानवर्धक वातावरणात साजरी करण्यात आली. Jayanti at Kane Sanskrit Sub-centre
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतरत्न डॉ पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र आणि नाट्यशास्त्र प्रशिक्षण वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, नाट्यशास्त्र प्रशिक्षक डॉ. शशांक पाटील हे मान्यवर उपस्थित होते. Jayanti at Kane Sanskrit Sub-centre
सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याशिवाय एप्रिल महिन्यात भारतीय नववर्ष गुढीपाडवा आणि क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने महात्मा फुले यांच्या प्रतिमेस आणि गुढीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या महापुरुषांच्या जयंतीचे आणि नववर्षाचे औचित्य साधत नाट्यशास्त्र प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षणार्थी कामिनी महाडिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व त्यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग सर्वांसमोर मांडले. डॉ. शशांक पाटील यांनी जयवंत दळवी यांच्या ‘सूर्यास्त’ या नाटकातील उताऱ्याचे नाट्यवाचन केले. अविनाश चव्हाण यांनी भारतीय संविधानाची माहिती दिली. स्वरूप काणे यांनी सुरेश भट यांनी लिहिलेल्या गीताचे गायन केले. Jayanti at Kane Sanskrit Sub-centre
अनघा नागवेकर यांनी नववर्षाचे स्वागत करत कविता वाचन केले. सोनिया पाटील यांनी महात्मा फुले यांच्या विषयी माहिती सांगितली. अक्षय माळी यांनी महात्मा फुले यांनी लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची माहिती सादर केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी अध्यक्षीय भाषण केले. यावेळी संविधानाची रचना करीत असताना स्वातंत्र्य, समानता आणि एकात्मता यांचा प्रामुख्याने विचार केला गेला आहे. या थोर महापुरुषांनी मांडलेली तत्त्वे आणि विचार हे आजच्या काळातही सुसंगत असून सर्वांनी त्याचे आचरण आणि त्यांच्या साहित्याचे अध्ययन आवश्य केले पाहिजे. असे ते म्हणाले. Jayanti at Kane Sanskrit Sub-centre
उपकेंद्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, नाट्यशास्त्र प्रशिक्षण वर्गाचे विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सूत्रसंचालन सविता आंबर्डेकर यांनी केले. आसक्ती भोळे यांनी आभारप्रदर्शन केले. Jayanti at Kane Sanskrit Sub-centre