सैन्य दलात पॅराशूट कमांडो म्हणून कार्यरत; अरूणाचल प्रदेशमध्ये बचावकार्य करताना
गुहागर, ता.19 : भारतीय सैन्य दलात पॅराशूट कमांडो म्हणून कार्यरत असलेले वाशिम जिल्ह्यातील सोनखास येथील जवान अमोल गोरे हे भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेश येथे बचाव कार्य करीत असताना शहीद झाले आहेत. आज १९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. Jawan Amol Gore Martyred

शहीद जवान अमोल गोरे हे देशसेवेसाठी सैन्यदलात दाखल झाले होते. पॅरा कमांडो म्हणून ते कार्यरत होते. याआधी झालेल्या अनेक महत्वपूर्ण अभियानात त्यांनी सहभाग घेऊन देशसेवा केली होती. २४ एप्रिलला ते सुट्टी घेऊन गावी येणार होते. मात्र, त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली आहे. अमोल यांना अवघा ४ वर्षाचा चिमुकला मुलगा असून त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. अमोल सारख्या धाडसी आणि मनमिळावू जवानाच्या शहीद होण्याने वाशिम जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. Jawan Amol Gore Martyred
सोनखास गावातील सुपुत्र अमोल गोरे हा १४ एप्रिलला भारत-चीन सीमेवरील अरुणाचल प्रदेश या ठिकाणी युनिट ११ SF पॅरा सैनिक पेट्रोलिंगमध्ये कर्तव्य बजावत असताना सोबतचे दोन जवान सकाळी ४ वाजता पहाडीवरुन घसरल्यामुळे बर्फात दबले गेले होते. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान त्या दोन जवानांना वाचवण्यासाठी अमोलने सकाळी ४ वाजता बर्फामध्ये उडी घेतली. मात्र त्यात त्या दोघांना वाचविण्यात यश आलं. पण, अमोल गोरे हे सैनिक शहीद झाले. Jawan Amol Gore Martyred
