• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर विजापूर महामार्गावरील खड्डे तत्काळ भरावेत

by Guhagar News
December 30, 2023
in Ratnagiri
118 1
2
Janwalkar's statement to the National Highways Sub-Division

विनोद जानवळकर

231
SHARES
660
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मनसे उपजिल्हाअध्यक्ष विनोद जानवळकर यांचे राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूण यांना निवेदन

गुहागर, ता. 30 : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातास कारणीभूत ठरणारे खड्डे तत्काळ भरावेत यासाठी गुहागर मनसेने आक्रमक रूप धारण केले आहे. मनसेचे उपजिल्हाअध्यक्ष विनोद जानवळकर यांनी उपविभागीय अधिकारी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूण यांना लेखी निवेदनातून सदर खड्डे तत्काळ भरले न गेल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. Janwalkar’s statement to the National Highways Sub-Division

गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डयांबाबत गुहागर मनसेने वेळोवेळी आक्रमक भूमिका धारण केली आहे.माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी याबाबत अनेक वेळा आवाज उठविला आहे. सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अनेक वेळा पुढाकार घेतला आहे. अनेक दिवस येथील महामार्गावरील खड्डे धोकादायक ठरत आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर किर्तनवाडी, गुहागर शृंगारतळी पालपेणे फाटा येथील पूल, रामपूर, तांबी, पाचाड, गणेशखिंड,अशाठिकाणी मोठं-मोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्ता मंजूर होऊन सुद्धा अनेक वर्षे उलटूनही सदर रस्ता पूर्ण होत नाही यामुळे अनेक अपघात घडत आहेत त्यामुळे हे खड्डे त्वरित डांबराने भरावेत अन्यथा त्यास आपले कार्यालय सर्वस्वी जबाबदार राहील व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे. Janwalkar’s statement to the National Highways Sub-Division

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiJanwalkar's statement to the National Highways Sub-DivisionLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share92SendTweet58
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.