गुहागर, ता. 28 : जानवळे महात्मा गांधी तंटा मुक्त समितीच्या अध्यक्ष पदी सामाजिक सक्रिय कार्यकर्ते श्री. सचिन कोंडवीलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. Janwale Tanta Mukt Samiti President Sachin Kondvilkar
जानवळे ग्रामपंचायतीच्या सरपंच जान्हवी विखारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी तंटा मुक्त समिती अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. यावेळी कोंडवीलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कोंडवीलकर हे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असतात. तसेच अन्यायाविरोधात आवाज उठवत आले आहेत. यावेळी बोलताना श्री. कोंडविलकर म्हणाले, सर्वांच्या सहकार्याने गावात निर्माण होणारे तंटे सामंजसपणाने सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. Janwale Tanta Mukt Samiti President Sachin Kondvilkar