गुहागर, ता. 18 : तालुक्यातील जानवळे (जानवळकरवाडी) येथील श्री साई मंदिराचा २६ वा वर्धापन दिन बुधवार दि. २२ मे २०२४ रोजी विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व साई भक्तांनी श्री सत्यनारायण महापुजा दर्शनासाठी व श्री साई भंडारा साठी उपस्थित रहावे, असे आवाहन सर्व साईभक्तांकडून करण्यात आले आहे. Janwale Sai Temple Anniversary
श्री साई मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त बुधवार दि. २२ मे रोजी सकाळी ८ वा. श्री साई मुर्तीला विधिवत अभिषेक, सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापुजा, तीर्थप्रसाद आरती, दुपारी १२ ते १ वा. जानवळे वारकरी संप्रदाय यांचा हरीपाठ, दुपारी १ वा.साई भंडारा दुपारी २ वा. ह.भ.प. कमलाकर वणगे, जानवळे यांचे किर्तन, रात्रौ ७ वा. महाआरती, रात्रौ.८.०० वा. दत्तगुरु दर्शन मंडळ जानवळे, मधलीवाडी यांचे भजन होणार आहे. Janwale Sai Temple Anniversary