नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्या, मनसेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील ग्रामपंचायत जानवळे कार्यालय इमारत धोकादायक असल्याने नवीन इमारतीसाठी निधी त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी गुहागर तालुका मनसेतर्फे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना करण्यात आली आहे. Janavle Gram Panchayat building dangerous
या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत जानवळे कार्यालय इमारत ही धोकादायक स्थितीत आहे. सध्या पावसाळ्यामध्ये या इमारतीच्या छप्परावर प्लास्टिक कागद टाकण्यात आले आहे. तसेच संपूर्ण इमारत ही धोकादायक स्थितीत आहे. या इमारतीचे मालकी विद्यमान सरपंच ग्रामपंचायत जानवळे यांचेकडे असून सदरच्या इमारतीचे बांधकाम जवाहर रोजगार हमी योजनेतून झालेले आहे. सध्याचे इमारतीचे बांधकाम सन १९९५ साली झालेले आहे. २९ वर्षापूर्वीचे बांधकाम आहे. त्यामुळे इमारतीचे बांधकाम धोकादायक स्थितीत असून या इमारतीचे बांधकाम ढासळण्यास सुरुवात झाली आहे. इमारतीचे बांधकामाचे क्षेत्रफळ ३६८ चौ.फु. आहे. इमारतीचे बांधकाम जांभा दगडाच्या भिंतीचे आहे. छप्पर कौलारू व लाकडी आहे. इमारतीचा पाया कमकुवत आहे. बाहेरून प्लास्टर नाही. त्यामुळे ही इमारत धोकादायक बनली आहे. सदर इमारतीचे क्षेत्रफळ कमी असल्यामुळे त्याठिकाणी ग्रामसभा व इतर सभा ग्रामपंचायतीमध्ये होऊ शकत नाही. ३६८ चौ.फु. मध्ये दोन खोल्या असल्यामुळे मासिक सभेस सुद्धा ग्रामपंचायत सदस्यांना अडचण होत आहे. पावसाळ्यात छप्पर गळत असल्यामुळे कार्यालयीन रेकॉर्ड खराब होत आहे. तसेच छप्पर कौलारू असल्यामुळे उंदरांचा फारच उपद्रव होत आहे. भिंतीना तडे गेलेले आहेत. त्यामुळे या धोकादायक इमारतीचे निर्लेखन करण्यात येऊन या ठिकाणी नवीन इमारत होण्यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न व्हावा, अशी विनंती करण्यात आली आहे. Janavle Gram Panchayat building dangerous
यावेळी निवेदन देताना मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष प्रसाद कुष्टे, उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, जानवळे शाखा अध्यक्ष सुशांत कोळबेकर आदी उपस्थित होते. Janavle Gram Panchayat building dangerous