गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्ह्यातील वालावलकर रुग्णालय (डेरवण) येथे शुक्रवार दि.७ एप्रिल २०२३ रोजी संतोष जैतापकर याच्या वैद्यकीय टीममधील रुग्णसेवक म्हणून काम करणारे समाजसेवक श्री काशीराम पास्टे आणि मितेश घडशी यांनी वालावलकर रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय उपचाराबद्दल चर्चा केली. तसेच वालावलकर रुग्णालयाच्या डीन आणि मेडिकल डायरेक्टर डॉ. सुवर्णा पाटील मॅडम याचीही भेट घेण्यात आली. Jaitapkar’s team visited Valawalkar Hospital

यावेळी पाटील मॅडम यांनी आपल्या पदाधिकारी यांच्या समवेत 4 तास वैद्यकीय आरोग्य बाबत चर्चा सत्र केले आणि हॉस्पिटल मधील वेगवेगळ्या योजना तसेच संपूर्ण हॉस्पिटलचा आराखडा स्वतः वैयक्तिक रित्या फिरवून दाखवला. यावेळी त्या म्हणाल्या, संतोष जैतापकर याच्या वैद्यकीय टीमला आमचं कायम सहकार्य असेल. तसेच एक दिवस पूर्ण वैद्यकीय टीमने संतोष जैतापकर साहेब याच्या बरोबर या असे आग्रहाचे निमंत्रण दिले. Jaitapkar’s team visited Valawalkar Hospital

त्यावेळी हॉस्पिटल मधील डॉ.सुवर्णा पाटील मॅडम याच्या बरोबर डॉ.स्वाती सोनावणे, डॉ.रुपाली चव्हाण, श्री सचिन धुमाळ उपस्थित होते. वालावलकर रुग्णालय (डेरवण) या भेटीसाठी विशेष सहकार्य श्री सचिनजी धुमाळ यांचे लाभले. Jaitapkar’s team visited Valawalkar Hospital
