जिल्हाध्यक्ष केदार साठे, ताकदीनिशी प्रचारात उतरणार
गुहागर, ता. 05 : महायुतीच्या विजयासाठी व्यापक विचार करुन संतोष जैतापकरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आता ते ताकदीनिशी प्रचारात उतरणार आहेत. अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वरिष्ठांनी अनेक बाजु समजून सांगितल्याने मनापासून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे यावेळी संतोष जैतापकर यांनी सांगितले. Jaitapkar’s retreat for the victory of Mahayuti
केदार साठे म्हणाले की, संतोष जैतापकर यांनी रितसर भाजप जिल्हा ओबीसी सेलच्या संयोजक पदाचा राजीनामा देवून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या मतांवर परिणाम झाला असता. त्यामुळे दिवाळी असूनही त्यांना भेटण्यासाठी आम्ही गुहागरला आलो होतो. आजही ते भाजपचे पदाधिकारी आहेत. वैद्यकिय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी इतके मोठे काम केले आहे की त्यांना मानणारा वर्ग या मतदारसंघात आहे. म्हणूनच त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी आमची इच्छा होती. आमच्या विनंतीला मान देवून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. इतकेच नव्हेतर महायुतीच्या प्रचारातही ते ताकदीनिशी उतरणार आहेत. Jaitapkar’s retreat for the victory of Mahayuti
यावेळी संतोष जैतापकर म्हणाले की, उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय मी कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी घेतला होता. मात्र भाजपचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार नारायण राणे यांच्यासह अनेक संपर्क साधुन महायुतीच्या विजयाचा व्यापक विचार करुन उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले. यामागची वेगवेगळी कारणेही मला सांगितली गेली. मी भाजपचा, पक्षशिस्त मानणारा कार्यकर्ता आहे. भाजपला ही जागा मिळावी अशी माझी मनापासुनची इच्छा होती. मात्र ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. म्हणून मी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र माझ्या उमेदवारीमुळे महायुतीच्या मतांमध्ये फुट पडेल आणि ती विरोधकांच्या विजयाचा अडसर दूर करेल. असे वातावरण बनल्याने भाजपच्या नेत्यांच्या विनंतीला मान देवून मी अर्ज मागे घेतला आहे. Jaitapkar’s retreat for the victory of Mahayuti
या पत्रकार परिषदेला भाजप प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रशांत शिरगांवकर, जिल्हाध्यक्ष केदार साठे, जिल्हा कार्यकारीणीतील बावाशेठ भालेकर, यशवंत बाईत, गुहागरचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे आदी उपस्थित होते. Jaitapkar’s retreat for the victory of Mahayuti