• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संतोष जैतापकर यांच्या प्रयत्नातून रुग्णाला साह्य

by Mayuresh Patnakar
April 7, 2023
in Guhagar
163 1
1
Help to the needy in Velneshwar from Chief Minister's Fund
320
SHARES
913
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळवून दिले 45 हजार

गुहागर, ता. 07 : सांगलीमध्ये गंभीर आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 45 हजार रुपयांची मदत संतोष जैतापकर यांनी मिळवून दिली आहे.  दिनेश तांडेल असे या रुग्णाचे नाव असून तो वेळणेश्र्वरचा रहीवासी आहे. आजपर्यंत गुहागर तालुक्यातील रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुमारे 25 लाखांची मदत जैतापकर यांनी केली आहे. Jaitapkar’s efforts helped the patient

गुहागर तालुक्यातील वेळणेश्र्वरचे दिनेश तांडेल हे गंभीर रोगावर सांगलीतील होरीजन रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र रुग्णालयाचा खर्च भागविण्यासाठी तांडेल परिवाराला पैसे अपूरे पडू लागले. ही माहिती चंद्रकांत पावसकर, प्रकाश पावसकर, संदीप पावसकर, समीर पावसकर यांनी मुंबईस्थित संतोष जैतापकर यांना सांगितली. त्यानंतर जैतापकर यांनी दिनेश तांडेल यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करुन प्रस्ताव पाठवला. हा प्रस्ताव मंजूर होवून 45 हजार रुपयांचे आर्थिक साह्य होरीजन रुग्णालय सांगलीच्या खात्यात जमा झाले. Jaitapkar’s efforts helped the patient

व्यवसायानिमित्त मुंबई रहाणाऱ्या संतोष जैतापकर यांचे मुळ गाव नरवण. कोरोना काळात कोकणातील रुग्णांना मुंबईत उपचारासाठी मदत करण्याची जबाबदारी भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी घेतली. पक्षभेद विसरुन त्यांनी गुहागर तालुक्यातील मुलनिवासी असलेल्या अनेक चाकरमान्यांना त्यांनी वैद्यकिय मदत मिळवून दिली. कोरोना संकटात तातडीने मदत मिळणे गरजेचे असल्याने संतोष जैतापकर यांनी  मनोज डाफळे, जयराम पवार, काशीराम पास्टे, संतोष निंबरे, मितेश घडशी आदी सहकाऱ्यांना सोबत घेवून वैदयकिय टिम बनवली होती.  या सर्वांच्या मुंबईतील बहुतांशी रुग्णालयात परिचय झाला होता. तेथील यंत्रणा कशी काम करते याची माहिती झाली होती. त्यामुळे कोरोना काळातील अनुभवाचा उपयोग करुन गुहागर विधानसभेतील रुग्णांना वैद्यकिय मदत मिळवून देण्याचे काम संतोष जैतापकर यांनी सुरुच ठेवले. त्याचबरोबर शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा कार्यरत केलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ रुग्णांना कसा मिळवून द्यायचा हे देखील समजून घेतले. जुलै 2023 पासून आजपर्यंत 10 महिन्यात 25 लाखाहून अधिक मदत संतोष जैतापकर यांनी गुहागर, चिपळूण परिसरातील रुग्णांना मिळवून दिली आहे. Jaitapkar’s efforts helped the patient

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiJaitapkar's efforts helped the patientLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share128SendTweet80
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.