• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जैतापकरानी घेतली अपघातग्रस्तांची भेट

by Mayuresh Patnakar
September 14, 2022
in Guhagar
22 0
0
Jaitapkara visited the accident victims
43
SHARES
123
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.14 : सोमवारी सकाळी आरे नागदेवाडी येथे झालेल्या एस. टी अपघातातील जखमीची भाजपा ओबीसी मोर्चा, जिल्हाध्यक्ष. श्री संतोष जैतापकर यांनी गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. तेथील डॉक्टरांसोबत चर्चा केली. व जे काही सहकार्य लागेल ते भाजपा तर्फे करण्यात येईल, अशी ग्राही दिली. Jaitapkara visited the accident victims

सोमवारी सकाळी आरे नागदेवाडी येथे धोपावे चिपळूण ही एस. टी. रानवीकडे जाणाऱ्या शृंगारतळी अंजनवेल एस.टी.वर आदळली. या धडकेमध्ये दोन्ही बसमधील 41 प्रवासी जखमी झाले.  या प्रवाशांना आरजीपीपीएल मेडिकल सेंटरमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी 22 प्रवाशांना ग्रामिण रुग्णालय गुहागर येथे नेण्यात आले होते. त्यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, नगरपंचायतीमधील गटनेते उमेश भोसले, श्रद्धा घाडे, शार्दुल भावे, मंदार पालशेतकर, हेमंत बारटक्के  ग्रामीण रुग्णालयात पोचले. त्यांनी सर्व रुग्णांसाठी बेड व अन्य व्यवस्था करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मदत केली. Jaitapkara visited the accident victims

अपघाताचे वृत्त कळताच भाजपचे ओबीसी मोर्चा, जिल्हाध्यक्ष. श्री संतोष जैतापकर यांनी ग्रामिण रुग्णालयात जावून जखमींची भेट घेतली. डॉ. बळवंत यांच्या बरोबर उपचारांविषयी चर्चा केली. तसेच उपचारांची अधिक गरज असलेल्या रुग्णांना अन्य ठिकाणी न्यायचे असल्य़ास सर्व प्रकारचे सहकार्य भाजपा करेल, असे आश्वासन जैतापकर यांनी दिले. Jaitapkara visited the accident victims

यावेळी गुहागर भाजपा शहर अध्यक्ष श्री संगम मोरे, गटनेते श्री उमेश भोसले, नगरसेवक श्री गजानन वेल्हाल, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री संजय मालप आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. Jaitapkara visited the accident victims

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiJaitapkara visited the accident victimsLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.