गुहागर, ता. 21 : एमकेसीएलच्या (MKCL) २२ व्या वर्धापनदिनी शृंगारतळी येथील युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे प्रा. जहूर बोट यांचा नेहरू सेंटर मुंबई येथे विशेष गौरव करण्यात आला. या गौरवाबद्दल प्रा. बोट यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Jahoor Bot honored by MKCL


शृंगारतळी येथील युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरने कॉम्प्युटर प्रशिक्षणाच्या प्रवेशांमध्ये आणि गुणवत्ता पूर्ण प्रशिक्षणामध्ये गेली अनेक वर्ष सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून व व्यावसायिक निष्ठा जोपासत युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरने आजवर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संगणक अभ्यासक्रमाद्वारे माहिती तंत्रज्ञानावर आधारित रोजगारांसाठी सक्षम बनविले. त्यामुळे त्यांना डिजिटल क्षेत्रात यशस्वी करिअर करण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला. युनिटेक कॉम्प्युटरच्या या भरीव योगदानाबद्दल एमकेसीएलच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र संचालक प्रा. जहूर बोट यांचा डॉ. अनिल काकोडकर, डॉ. निशिगंधा देऊळकर, डॉ. जे.बी.जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालिका विना कामत व डॉ.अनंत सरदेशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले. भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. Jahoor Bot honored by MKCL

