गुहागर ता. 12: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनमध्ये असणाऱ्या मराठी उद्योजकांनी घेतला आहे. Jagdamba will bring Talwar back from London
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लंडन येथिल मराठी उद्योजकांच्या ‘ओव्हरसीज महाराष्ट्रीयन प्रोफेशनल्स अँड आंत्रप्रेन्युअर्स ग्रुप-यूके’ (ओमपेग-युके) या संघटनेच्या पदाधिकारी आणि सभासदांसोबत आयोजित बैठकीत संवाद साधला. या संघटनेचे पदाधिकारी रवींद्र गाडगीळ, आशुतोष देशपांडे, अभिजीत देशपांडे आणि जय तहसिलदार यांच्या पुढाकारात ही बैठक पार पडली. Jagdamba will bring Talwar back from London

ब्रिटनमधील भारतीय आणि विशेषतः मराठी लोकांनी ब्रिटिश सरकारला मोठ्या प्रमाणात पत्रे लिहून जगदंब तलवार आणि वाघनखे भारताला परत देण्याची मागणी करावी असे आवाहन मंत्री मुनगंटीवार यांनी केले. त्याप्रमाणे ब्रिटीश सरकारला मोठ्या प्रमाणात पत्रे लिहिण्याचा निर्णय आणि त्याकामी ब्रिटनस्थित सर्व भारतीयांचा सहभाग घेण्याचाही यावेळी ‘ओमपेग-युके’ च्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. Jagdamba will bring Talwar back from London
तसेच विविध ब्रिटिश उच्चपदस्थ अधिकारी आणि ब्रिटिश सरकारमधील उच्चपदस्थ राजकारणी यांच्या भेटी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखे भारताला परत करण्याची मागणी करण्याचाही निर्णय या संघटनेने घेतला आहे. लंडनस्थित मराठी उद्योजकांनी ब्रिटनमधील इतर व्यवसायातील मराठी सोबतच अन्य भारतीय व्यावसायिक व नोकरदार मंडळींना याकामी सोबत घ्यावे, असे आवाहनही मंत्री मुनगंटीवार यांनी केले आहे. Jagdamba will bring Talwar back from London
