• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गजानन जाधव काँग्रेसच्या सामाजिक न्यायचे अध्यक्ष

by Mayuresh Patnakar
September 12, 2023
in Guhagar
77 1
0
Jadhav Congress President of Social Justice
152
SHARES
433
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी असलेले गजानन जाधव यांची काँग्रेस (आय)  पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे गुहागर तालुका अध्यक्ष  म्हणून घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अशोक जाधव यांनी याबाबतचे नियुक्ती पत्र गजानन जाधव यांना दिले.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस मुजावर साहेब, गुहागर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रियाज ठाकुर, गुहागर तालुका सेवा दल अध्यक्ष तुळशिराम पवार, काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र भुरण, गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, धुमक गुरुजी, विनय चव्हाण, वैभव आदवटे, अविनाश जाधव, सरिता चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. Jadhav Congress President of Social Justice

गजानन जाधव हे गुहागर तालूका काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाचे उपाध्यक्ष, मळण विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक, लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य संघटनेचे गुहागर तालुका अध्यक्ष, राझ न्यूज कोकणचे रिपोर्टर, गुहागर तालुका प्रेस क्लबचे सल्लागार अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. त्याच्या नियुक्तीचे वृत्त कळताच सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. Jadhav Congress President of Social Justice

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiJadhav Congress President of Social JusticeLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share61SendTweet38
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.