इच्छुकांनी 28 जुलैपर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन
गुहागर, ता. 20 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) संगमेश्वर येथे विविध विकासकामे व इमारत दुरुस्तीसाठी वास्तुविशारद सल्लागार (Architect Consultant) नियुक्त करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपली दरपत्रके संस्थेच्या कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन आय.एम.सी. ऑफ आय.टी.आय. संगमेश्वरचे सदस्य सचिव यांनी केले आहे. ITI Sangameshwar
संस्थेमध्ये ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ (PPP) अंतर्गत संस्था व्यवस्थापन समिती (IMC) कार्यरत असून, उपलब्ध विकास निधीतून विविध विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. नियुक्त होणाऱ्या सल्लागाराकडे नवीन इमारतीचे आराखडे तयार करणे, जुन्या इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण, अंतर्गत सजावट, आरसीसी व स्ट्रक्चरल स्टील डिझाइन, अंदाजपत्रके तयार करणे तसेच प्रत्यक्ष कामांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असेल. ITI Sangameshwar
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकृत पॅनेलवरील असणे आवश्यक आहे. इच्छुकांनी व्यावसायिक मोबदल्यासह दरपत्रके हस्ते (बाय हँड) शासकीय सुट्ट्या वगळून कार्यालयीन वेळेत २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर येथे सादर करावीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ITI Sangameshwar