गुहागर, ता. 30 : संगमेश्वर तालुक्यातील काटवली येथील सुपुत्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) संगमेश्वरचा माजी विद्यार्थी सुजित जाधव याची स्पेनमधील एका आंतरराष्ट्रीय पॅसेंजर शिप कंपनीत ‘असिस्टंट प्लंबर’ पदावर निवड झाली आहे. या पदासाठी त्याला प्रतिमहा एक लाख रुपयांहून अधिक वेतन मिळणार असून, त्याच्या या यशामुळे आयटीआय संगमेश्वरसह संपूर्ण तालुक्याचा गौरव झाला आहे.
जिद्द, मेहनत आणि तांत्रिक कौशल्याच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात, हे सुजित जाधवने आपल्या यशातून सिद्ध केले आहे. छोट्याशा काटवली गावातून थेट स्पेनमधील नामांकित पॅसेंजर शिप कंपनीपर्यंत पोहोचलेल्या त्याच्या प्रवासाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ITI Sangameshwar student selected in Spain

आपल्या यशाबद्दल बोलताना सुजित जाधव म्हणाला की, आजच्या तरुणांनी केवळ पदवी मिळविण्यावर भर न देता प्रत्यक्ष कौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. फिटिंग, वेल्डिंग, प्लंबिंग, सुतारकाम, इलेक्ट्रिकल आणि यांत्रिक कामांसारख्या तांत्रिक कौशल्यांना जगभरात मोठी मागणी असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मानवी तांत्रिक कौशल्याची जागा घेऊ शकत नाही, असे त्याने सांगितले. ITI Sangameshwar student selected in Spain
तरुणांनी आयटीआयसारख्या व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊन आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत. त्याद्वारे जागतिक स्तरावरही उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. सुजित जाधवच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याधारित शिक्षणाबाबत नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ITI Sangameshwar student selected in Spain
