• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गायरहाट नदीवरील लोखंडी साकवाला वाली कोण ?

by Guhagar News
June 8, 2023
in Guhagar
168 1
0
Iron Bridge over Gayrahat River Dangerous
329
SHARES
940
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उमराठ खुर्द आंबेकरवाडी आणि मुसलोंडी गावांना जोडणारा पूल धोकादायक

गुहागर, ता. 08 : तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडी आणि मुसलोंडी बारगोडेवाडी या दोन्ही गावांची गावसीमा एकच असून ती दोन्ही गावांच्या मध्यभागातून वाहणाऱ्या गायरहाट नदीवरून आहे. या नदिवर साधारणतः २०/२५ वर्षांपूर्वी कै. तात्या साहेब नातू आमदार असताना शासकीय योजनेतून  एक लोखंडी साकव बांधण्यात आलेला होता. या साकवाचे लोखंडी साहित्य/सामुग्री गंजल्यामुळे या साकवा वरून रहदारी करणे अतिशय धोकादायक झालेले आहे. Iron Bridge over Gayrahat River Dangerous

Iron Bridge over Gayrahat River Dangerous

या दोन्ही गावांची भौगोलिक रचना चढउतारांची आहे. या दोन्ही गावांना जोडणारी एक पुर्वापार आडवळणाची पायवाट आहे. या  दोन्ही गावांत वर्षभर दळणवळण आणि नातेवाईक यांच्याकडे जाण्या-येण्यासाठी हीच एकमेव जवळची पायवाट आहे. याच गायरहाट पायवाटेच्या दरम्याने गायरहाट नदीवर साधारणतः २०/२५ वर्षांपूर्वी कै. तात्या साहेब नातू आमदार असताना शासकीय योजनेतून  एक लोखंडी साकव बांधण्यात आलेला होता. हा साकव ग्रामपंचायत उमराठच्या अंतर्गत असून सदर लोखंडी साकव बांधल्यापासून आज पर्यंत त्याची काहीही डागडुजी किंवा रंगरंगोटी सुद्धा झालेली नाही.

आता तर या साकवाचे लोखंडी साहित्य/सामुग्री गंजल्यामुळे या साकवा वरून रहदारी करणे अतिशय धोकादायक झालेले आहे. साकव दुरूस्ती नसल्यामुळे पावसाळ्यात तर उमराठ खुर्द आंबेकरवाडी ते मुसलोंडी या दोन्ही गावांचा जाण्या-येण्याचा मार्ग बंद असतो. त्यामुळे मोठी अडचण भासते आहे. याबाबत गुहागरचे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच बांधकाम उपविभाग, पंचायत समिती गुहागर या दोन्ही ठिकाणी ग्रामपंचायत उमराठने पत्रव्यवहार केला असता त्यांच्या यादीत या लोखंडी साकवाचे नाव समाविष्ट नसून हा साकव जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असावा असे समजले. Iron Bridge over Gayrahat River Dangerous

Iron Bridge over Gayrahat River Dangerous

गेली दोन वर्षे सदर लोखंडी साकवाच्या दुरूस्ती बाबत संबंधितांकडे पाठपुरावा चालूच होता. त्या नंतर मात्र ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी मा. अधिक्षक अभियंता साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी यांना दि. १८/०१/२०२३ रोजी विनंती अर्ज पाठवून सदर साकवाची वस्तूस्तिथी मांडून या पावसाळ्यापूर्वी साकवाची दुरूस्ती करून मिळावी आणि ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी दि. ६/२/२०२३ व दि. १९/४/२०२३ रोजी मा. अधिक्षक अभियंता साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग, रत्नागिरी यांना रजिस्टर द्वारे स्मरण पत्र पाठवून सदर साकवाच्या दुरूस्ती बाबत काय कारवाई करण्यात येत आहे ? याबाबत विचारणा केली आहे. परंतु सदर बाबतीत काहीही पत्रपोच किंवा साधे उत्तर सुद्धा अद्याप मिळालेले नाही. Iron Bridge over Gayrahat River Dangerous

अशा प्रकारे सरपंचांच्या पत्राला काहीही उत्तर किंवा साधी पोच प्रशासकीय यंत्रणा देत नसेल आणि केराची टोपली दाखवली जात असेल तर सर्व सामान्य माणसाला प्रशासकीय यंत्रणा काय न्याय मिळवून देणार? मग उमराठ खुर्द आंबेकरवाडी व मुसलोंडी या दोन्ही गाव जोड गायरहाट नदीवरील लोखंडी साकवाला वाली कोण ? असा प्रश्न ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी विचारला असून संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी, या प्रश्नी लक्ष घालून जनसामान्यांची ही होणारी गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती पुन्हा एकदा उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी केली आहे. Iron Bridge over Gayrahat River Dangerous

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIron Bridge over Gayrahat River DangerousLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMLA Tatya Saheb NatuNews in GuhagarUpdates of Guhagarआ. तात्या साहेब नातूगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share132SendTweet82
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.